पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवणुकीवर विशेष प्रयत्न करणार -खासदार श्रीकांत शिंदे
पुणे :पुण्यातील वाहतूक कोंडी चा प्रश्न सतत जाणवत आहे.प्रामुख्याने धसास लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरविलेले असून या प्रश्नाच्या सोडवणुकीवर विशेष प्रयत्न करणार असे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
शिंदे म्हणाले,’ मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी गेले. या मार्गाचे काम रेकॉर्ड टाईममध्ये करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. आज पुण्यात अनेक विद्यापीठ आहेत, हॉस्टेल चे प्रश्न आहेत ते सोडवले जातील. लाल महाल मधील लाईट आणि sound शो कसा सुरू होईल याचा निर्णय लवकर होईल पुण्यातील वाहतूक कोंडी प्रश्न मोठा आहे, वाहतूक कोंडी कमी कशी होईल याचा ही विचार केला जातोय, असंही शिंदे म्हणाले.
२.५ वर्षात जे काम झाले नाही ते ५ महिन्यात या सरकारने केले आहे. विविध निर्णय या सरकारने घेतले. फक्त घोषणा नाही, त्याची अंबलबजावणी देखील सरकार करत आहे. २.५ वर्ष मुख्यमंत्री फक्त आपण असले पाहिजे, असं होतं. मात्र कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे उठाव झाला. यामुळे आज ५० आमदार आणि १३ खासदार आमच्या बरोबर आहेत, हा इतिहास आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले,उठल की एक भोंगा सुरू होतो. तेच तेच बोलायच. खोके, खंजीर, धोका एवढंच बोलतात. आधी खोके कोणाकडे जात होते कुठे जात होते. कोण मोजायचे, त्यामुळे त्यांना नुसते खोके खोके आठवतात.
पण आता परत कधीच खोके सुरु होणार नाहीत. हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
