Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप –  ब्रिलियंट , आर्यनस्  संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश   

पुणे : पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब 19 वर्षाखालील चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत साखळी ब्रिलियंट संघाने  सहारा संघाचा व  आर्यनस् संघाने स्पार्क संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
 
ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी क्रिकेट मैदानावर झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना ब्रिलियंट संघाने 44.4 षटकांत सर्वबाद 247 धावा केल्या. यात तनय पुसाळकरने 53 चेंडूत 4 चौकार व एका षटकारासह अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव बळकट केला. तुषार राठोडने 38 धावा करून तनयला सुरेख साथ दिली. 247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत निलय शिंगवी व विराज रघुनाथ यांच्या अचूक गोलंदाजीने सहारा संघाचा डाव 50 षटकांत 8 बाद  211 धावांत रोखला. तनिश पवारने 60 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 14 धावांत 4 गडी बाद करणारा निलय शिंगवी सामनावीर ठरला.
 
लेजेंड्स क्रिकेट अकादमी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात प्रतीक साळुंकेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर आर्यनस् संघाने स्पार्क संघाचा 5 गडी राखून पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना स्पार्क संघाने 19.3 षटकांत सर्वबाद 81 धावा केल्या. 81 धावांचे लक्ष ज्ञानल थिगळेच्या नाबाद 31 तर ऋषी नाळेच्या 17 धावांसह आर्यनस् संघाने 19.1 षटकांत 5 बाद 82 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. केवळ 9 धावा देत 5 बळी घेणारा प्रतीक साळुंखे सामनावीर ठरला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी 
ब्रिलियंट: 44.4 षटकांत सर्वबाद 247 धावा(तनय पुसाळकर 52(53,4×4,1×6), तुषार राठोड 38(46,4×4), अनिरुद्ध 28(24,6×4), कौशल विरपणकर 4-63, रुद्राक्ष गायकवाड 123) वि.वि सहारा: 50 षटकांत 8 बाद  211 धावा (तनिश पवार 60(86,6×4,1×6), राज 37(54,3×4) निशांत पगारे नाबाद 31(49,2×6), निलय शिंगवी 4-14, विराज रघुनाथ 3-26 ) सामनावीर- निलय शिंगवी
ब्रिलियंट संघाने 36 धावांनी सामना जिंकला.
 
स्पार्क: 19.3 षटकांत सर्वबाद 81 धावा (मिहिर नरवडे 16(22,2×4), विघ्नेश काटे 13(19), प्रतीक साळुंखे 5-9, शिवम पाडुळे 2-19, ज्ञानल थिगळे 2-22) पराभूत वि आर्यनस्  : 19.1 षटकांत 5 बाद 82 धावा (ज्ञानल थिगळे नाबाद 31(60,4×4), ऋषी नाळे 17(29×4, 3×6), शशांक साबळे 1-12, विघ्नेश काटे 1-17) सामनावीर- प्रतीक साळुंखे आर्यनस् संघाने 5 गडी राखून सामना जिंकला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading