Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. मिलिंद जोशी यांची निवड

पुणे : मराठी वाङमय मंडळ अमळनेर आणि प्रा. अप्पासाहेब र. का. लेले ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्यावतीने आयोजित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक, वक्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. रविवार ४ डिसेंबर २०२२ रोजी सानेगुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी सभामंडपात होणाऱ्या या संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन, मुलाखत असे विविध कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती संमेलनाचे संयोजक डॉ. अविनाश जोशी यांनी कळविली आहे. प्रा. मिलिंद जोशी यांची आजवर विविध वाड्मयप्रकारात २१ पुस्तके प्रकशित झाली असून त्यांची महाराष्ट्रात बृहन्महाराष्ट्रात आणि परदेशातही विविध विषयांवर व्याख्याने झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading