उत्तराखंड–कर्नाटक, मध्य प्रदेश– मणिपूर– नागालँड संघाचे विजय
एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा : उत्तर प्रदेश–अरुणाचल प्रदेश–मेघालय संघ पराभूत
पुणे : मुलींच्या गटात उत्तराखंड-कर्नाटक संघाने तर मुलांच्या गटात मध्यप्रदेश- मणिपूर- नागालँड संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना भरतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र रोलबॉल संघटना व जिल्हा रोलबॉल संघटना यांचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
बाणेर येथील जिल्हा रोलबॉल मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेच्या मुलींच्या लढतीमध्ये उत्तराखंड – कर्नाटक संघाने उत्तर प्रदेश-अरुणाचल प्रदेश – मेघालय संघाला ४-० असे एकतर्फी पराभूत करताना विजयी सलामी दिली. उत्तराखंड – कर्नाटक संघाने मध्यंतराला ३-० अशी निर्णायक आघाडी घेतली होती. उत्तराखंड – कर्नाटक संघाकडून वैभवी कदमने २ (४.०८, १५.५१ मिनिटे) तर एस. सई (२.०२ मिनिटे) व प्रज्ञा गोरडे (२.५९ मिनिटे) प्रत्येकी एक गोल केला. उत्तर प्रदेश – अरुणाचल प्रदेश – मेघालय संघाला एकाही गोल नोंदविता आला नाही.
मुलांच्या गटातील लढतीत मध्य प्रदेश – मणिपूर – नागालँड संघाने हिमाचल प्रदेश –केरळा संघाला ५-१ असे पराभूत केले. मध्यंतराला मध्य प्रदेश – मणिपूर – नागालँड संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. मध्य प्रदेश – मणिपूर – नागालँड संघाकडून अभिषेक सिंग (४.१० मिनिटे), सुजय (६.३० मिनिटे), आदित्य गुलाटी (११.२३ मिनिटे), जलज एस. (१४.३९ मिनिटे), गुरुचरण सिंग (१५.३०) यांनी प्रत्येकी एक गोल केला. हिमाचल प्रदेश – केरळ संघाकडून अलेन जॉर्जने (१८.३८ मिनिटे) एकमेव गोल केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्र – ओडीसा व गुजरात – छत्तीसगड संघातील लढत ३ – ३ अशी अनिर्णीत राहिली. मध्यंतराला दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी राखली होती. महराष्ट्र ओडिशा संघाकडून महेक राउत (३.४५ मिनिटे), सोनिया शेळके (१७.४० मिनिटे) व श्रुती भगत (१९.१० मिनिटे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. गुजरात – छत्तीसगड संघाकडून रिनी रूपवाट्याने (१.००, १०.२१, १५.३० मिनिटे) तीन गोल केले.
