राज ठाकरेंनी स्वतः कोणत्या पातळींवर आहोत याचे आत्मपरीक्षण करावे.. काँग्रेस राज्य प्रवक्ते – गोपाळदादा तिवारी
मुंबई : ‘खालच्या पातळींवरील’ राजकारणावर आसुड ओढणाऱ्या राज ठाकरेंनी स्वतः कोणत्या पातळींवर आहोत (?) याचे देखील आत्मपरीक्षण करावे.. अन्यथा “लोका सांगे ब्रम्हज्ञान… अशी स्थिती झाल्याचे लक्षात येत नाही..! मध्यंतरीचा काही काळ राज ठाकरे ‘सत्य कथन करीत होते’ हेच त्यांचे ‘पुर्वसंचित पुण्य-कर्म’ आहे, म्हणूनच काँग्रेस पक्ष त्यांचे प्रती दया व्यक्त करतो, असे प्रतिपादन काँग्रंस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज ठाकरेंच्या मा राहुलजी गांधीं वरील टिकेवर केले..!
एका राजकीय पक्षास आपली राजकीय, तात्विक व वैचारीक भुमिका – ध्वज इ. ‘सत्ताघिशांच्या व ईडी’च्या दबावाखाली बदलावी लागते हीच् लोकशाहीची शोकांतिका आहे. तरी देखील, राहुलजींच्या तत्वा प्रमाणे, ज्यांना काँग्रेसची नेत्यांची भिती आहे तेच द्वेष व तिरस्कार करतात.. या धोरणाने ‘नफरत छोडो’ तत्वा प्रमाणे राज ठाकरेंना आम्ही माफ करतो..!
२०१४ व २०१९ मध्ये ही ५० खासदार व ५ राज्यात सत्ता आणणाऱ्या व देशात आजही क्र २ चे स्थान घेणाऱ्या काँग्रेसच्या मा राहुलजींचे नेतृत्व कुठे तर भारतात १ आमदाराचे संख्याबळ असणाऱ्या मनसेचे नेतृत्व कुठे ..? …त्यामुळे कोणी कोणाची लायकी तपासावी वा मेंदू तपासावा..? असा प्रश्न ही काँग्रेसने केला.
दरम्यान, ‘वि. दा. सावरकरांच्या माफीनाम्याची व ब्रिटीशांकडुन पेन्शन स्वीकारण्याची तुलना श्रीकृष्ण-निती’शी करून’ नव-हिंदुत्ववादी राज ठाकरेंनी अकलेचे तारे तोडले असुन जगास ‘सत्यघर्माची शिकवणुक’ देणाऱ्या श्रीकृष्णांच्या ‘गिता’ उपदेशाचा अभ्यास करणे त्यांचे साठी गरजेचे आहे असे प्रतिपादन काँग्र्स राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज ठाकरेंच्या मा राहूल गांधीं वरील टिकेवर केले..!
