दस्त नोंदणी कार्यालयात नागरिकांना सोयी सुविधा द्या – अतुल बहुले
पुणे : शहरातील हवेली सह पूर्ण शहरभर दस्त नोंदणसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे ,ताटकळत बसावे लागते ,कोणी नीट माहिती देत नाही ,बसायला जागा नाही तासन तास. उभे राहावे लागते ,ज्येष्ठ नागरिक असो महिला असो कोणालाही इथे कसलीही सोय नाही ,लाखो रुपयांचा लोकांकडून शुल्क घेऊनही लोकांना विविध समस्येला सामोरे जावे लागते, उध्दट वागणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते व उरुळी देवाची गावचे उपसरपंच अतुल बहुले यांनी नोंदणी महानिरीक्षक व पुणे विभागाचे प्रमुख यांना वरील सोयी तत्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .
तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाची तक्रार करावी ,सर्वांना एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बहुले यांनी केले आहे .
