‘हप्पू की उलटन पलटन’ने पूर्ण केले ९०० एपिसोड्स!
एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’ने ९०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. ही मालिका दरोगा हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी), त्याची दबंग दुल्हनिया राजेश (कामना पाठक), हट्टी आई कटोरी अम्मा (हिमानी शिवपुरी) आणि त्याच्या नऊ खोडकर मुलांच्या विलक्षण कृत्यांना दाखवते. ही मालिका हसवून-हसवून लोटपोट करणाऱ्या एपिसोड्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या यशस्वी टप्प्याला साजरे करण्यासाठी संपूर्ण टीमने सेटवर केक कापला.
९०० एपिसोड्स पूर्ण झाल्याबाबत योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, “प्रेक्षकांना हसवणे सोपे नसते आणि कॉमेडी ही सर्वात अवघड शैली आहे. प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करणाऱ्या या मालिकेचा भाग असल्याने मी स्वत:ला नशीबवाान मानतो. मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ने मला संधी व आनंद देण्यासोबत या भूमिकेच्या लोकप्रियतेने माझी घराघरामध्ये ओळख निर्माण केली आहे. मी जेथे जातो तेथे माझे चाहते मला माझा लोकप्रिय संवाद ‘अरे दादा’ असे म्हणत हाक मारतात. देशभरातील चाहते मला योगेश ऐवजी हप्पू म्हणून अभिवादन करतात तेव्हा मला अभिमान वाटतो. नुकतेच देव दिपावलीसाठी कामनासोबत वाराणसीला गेलो होतो, तेव्हा मी शहरामध्ये योगेश म्हणून फेरफटका मारण्याचे ठरवले. पण अनेक लोकांनी मला माझ्या कॉस्चुमशिवाय देखील ओळखले आणि माझ्यासोबत सेल्फी काढले, ज्यामुळे मी भारावून गेलो. तसेच त्यांनी आमची मालिका पाहण्याचा ते किती आनंद घेतात हे देखील सांगितले.!’’
कामना पाठक ऊर्फ राजेश हप्पू सिंग म्हणाल्या, “आम्हाला आणखी एक सुवर्ण टप्पा गाठण्यामध्ये मदत करण्यासाठी मी चाहत्यांचे जितके आभार ते कमीच आहे. ९०० एपिसोड्स पूर्ण करण्यामधून प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम विनोदी मालिका सादर करण्याप्रती संपूर्ण सर्जनशीलता आणि सपोर्ट टीमची अथक मेहनत दिसून येते. मालिका व मिळालेल्या यशाबाबत सांगायचे झाले तर मी स्वत:ला राजेश म्हणून पहिल्यांदा पाहिले त्याची मला आठवण येते. मी तेव्हा नर्व्हस होते आणि सोबतच उत्साहित देखील होते. आतापर्यंतचा प्रवास उत्तम राहिला आहे आणि मी आशा करते की तो पुढे देखील चालू राहो.’’ हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्मा म्हणाल्या, “मी प्रेक्षकांना हसवण्यासाठी अथक मेहनत घेतलेल्या संपूर्ण टीमचे आभार मानते. तसेच मी कटोरी अम्माला प्रेम व आदर दिलेल्या प्रेक्षकांचे देखील आभार मानते.’’
