जर्मन पाहुण्यांची डीईएस शाळांना भेट
पुणे : जर्मनीतील शिक्षण संशोधक ख्रिस्तियन क्वास यांनी टिळक रस्त्यावरील डीईएसच्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी गाणी सादर केली. संस्कृत श्लोक, गीतेचा सतरावा अध्याय आणि पोवाड्याचे सादरीकरण केले. काही विद्यार्थ्यांनी जर्मन आणि जपानी भाषेत संवाद साधला. दहावीच्या वर्गात भूगोलाच्या तासिकेला उपस्थित राहून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया समजावून घेतली. डीईएसच्या क्रीडा स्पर्धांना भेट दिली. डॉ. सविता केळकर यांनी संयोजन केले.
