सांस्कृतिक व संत विचारांची देवाणघेवाण अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन त्रिपुरा येथे डिसेंबर मध्ये
कोल्हापूर येथील पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी आणि आगरताळा येथे आयोजित होणाऱ्या संमेलनाची रूपरेखा स्वागत पर भाषणात प्रा डॉ प्रकाश खांडगे यांनी स्पष्ट केली त्यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले
कोरोनाच्या भीषण संकटानंतर मानवी जीवनातली आश्वासकता वाढविण्यासाठी संत विचार गरजेचा आहे हा विचार भारतातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाविण्यासाठी माध्यमांनी पूर्ण सहकार्य करावे अशी भूमिका डॉक्टर मदन महाराज गोसावी यांनी मांडली.
उत्तर पूर्व राज्यांमध्येही संतांची मोठी परंपरा : वर्मा, उपमुख्य मंत्री त्रिपुरा
*आपल्या देशाच्या अन्य भागांप्रमाणे उत्तर पूर्व राज्यांमध्ये अनेक संत व साहित्यिक झालेले आहेत. त्यांनी समाजामध्ये सर्वधर्मसमभाव हा विचार करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. देशातील इतर भागांनाही या संत साहित्याचे ओळख व्हावी म्हणूनच आम्ही त्रिपुरामध्ये अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन आयोजित करीत आहोत असे त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे झाली तरीही आपल्या हिंदुस्थानातील समृद्ध सांस्कृतिक परंपरा, वारसा टिकून राहिला आहे. तसेच उत्तर पूर्व राज्यांमध्ये अनेक मंदिरे आणि प्रार्थना स्थळे आहेत त्याचीही ओळख भारतामधील अन्य भागातील लोकांना व्हावी हा देखील या संमेलनामागचा उद्देश आहे.
त्रिपुरातील संमेलन यशस्वी होईल : डॉ. गोसावी
या संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. मदन महाराज गोसावी यांनी सांगितले,” आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या संत धार्मिक नेत्यांनी एकमेकांना अडीअडचणीच्या काळामध्ये मदत करण्याचा जो संदेश दिला आहे त्यामुळेच कोरोनाच्या महामारीमध्ये लोकांनी जात-पात धर्म विसरून एकमेकांना मदत केली आहे. संतांचे विचार माणसांचे जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. कोल्हापूर येथे एप्रिलमध्ये हे संत संमेलन जसे यशस्वी करून दाखवले तसेच आगामी संत संमेलन नाही यशस्वी होईल अशी मला खात्री आहे.
कार्यक्रमाचे सारांशित वेळापत्रक याप्रमाणे:
दिनांक ९ डिसेंबर २०२२
उद्घाटन सत्र-मुख्य अतिथी-
उपमुख्यमंत्री (त्रिपुरा सरकार) जिष्णु देव वर्मा
संमेलनाधक्ष्य – श्री चित्त महाराज, महंत, शांती काली मंदिर
कार्याध्यक्ष – डॉ मदन गोसावी, सदस्य, एनसीएलटी.
सत्र पहिले – भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधील आध्यात्मिक परंपरा आणि प्रथा.
सत्र दुसरे भारताच्या ईशान्येकडील राज्यांची पारंपारिक मुळे – योगिक, तांत्रिक आणि उपचार परंपरांचा इतिहास शोधणे.
ईशान्य पूर्व विभागीय सांस्कृतिक समिती
(NEZCC) द्वारे आमंत्रित केलेल्या मंडळांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम.
दिनांक १० डिसेंबर २०२२
सत्र ३– ईशान्य भारत – तीर्थ यात्रा आणि पर्यटनाच्या संधी
सत्र ४ – शेजारील देशांतील विद्यार्थी त्यांच्या सनातनच्या मुळांचे दृश्य सादर करतील.
सत्र ५ – ईशान्य भारताच्या विश्वास आणि परंपरांसमोरील आव्हाने.
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप समारंभ.
ईशान्य पूर्व विभागीय सांस्कृतिक समिती
(NEZCC) द्वारे आमंत्रित केलेल्या मंडळांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम.
