Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रकल्प बाहेर जात असताना धोतरं का बोलले नाही? : राज ठाकरे

मुंबई : ज्यावेळी महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात होते त्यावेळी आमचे धोतर का बोलले नाही अशा शब्दांत ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला. त्याचबरोबर त्यांनी राज्यात चाललेल्या अनेक मुद्यांवर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे गटाच्या नेत्यावर टीका केली.

रविवारी मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्याप्रसंगी मुंबई महानगर पालिकेसाठी राज ठाकरे मैदानात उतरले होते.

मनसेच्या आंदोलनाला इतर पक्षांच्या आंदोलनापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळाल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या काळामुळे सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका दोन ते अडीच वर्ष लांबणीवर गेल्या आहेत. यावर्षी मार्चमध्ये निवडणुका होतील असें वाटत होते. मात्र मी यांना (मनसे नेत्यांना) सांगत होतो की, मला वातावरणात निवडणूक दिसत नाही आहे. आता या निवडणुका पुढे जात डिसेंबर आला. आता पुन्हा कानावर येत आहे की पुढच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका लागतील असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात ते असे म्हणाले आहेत. यावेळी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखविणा-या मनसे कार्यकर्त्यांचं राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनसेची आंदोलने विस्मरणात जातील यासाठी काही जणांकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहेत. परंतु, मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.

उध्दव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंवरही राज ठाकरेंनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर आणि उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे. पैशांसाठी कोणासोबत पण युती करणा-यातला मी नाही असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. मशीदेच्या भोंग्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक पाहायला मिळाले. मशिदीवरील भोंगे निघाले पाहिजेत. आपण काढायला नाही सांगितले. फक्त हनुमान चालिसा लावू म्हणालोत आणि भोंगे उतरले. अजूनही काही ठिकाणी चर्बी उतरलेली नाही. जिथे जिथे भोंगे चालू असतील तिथे पोलिसांकडे तक्रार करा. पोलिसांनी ऐकले नाही तर तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस होऊ शकते. न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते. पोलिसांकडून काही झालं नाही तर मोठ्या ट्रकवर मोठे स्पिकर लावून हनुमान चालिसा लावा. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. जोपर्यंत आरे ला कारे होत नाही तोपर्यंत असेच होणार. दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर रोष व्यक्त करीत राज्यपालांनी महाराष्ट्रातील इतर भाषिकांवरील वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यपालांवर राज ठाकरे बरसले ते म्हणाले राजपाल तुम्ही गुजराती आणि मारवडींना विचारा तुम्ही महाराष्ट्रात का आले आहात. तुम्हाला तुमचे राज्य नव्हत का, असा प्रश्न देखील त्यांनी केला.

दरम्यान, राज ठाकरे अब्दुल सत्तारांवर चिडले. सत्तारांनी केलेल्या सुप्रिया सुळे यांच्या बद्दल वादग्रस्त विधानावर ते म्हणाले, राज्यातील राजकारणाची पातळी एवढ्या खालच्या स्तराला गेले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading