‘संविधान दिन – ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’मधील कलाकार सांगत आहेत भारतीय संविधानाच्या रचनेमधील बाबासाहेब यांच्या योगदानाबाबत
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले, जे २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. दरवर्षी देशामध्ये २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारताचे संविधान’ स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यावर्षीच्या संविधान दिनानिमित्त एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’मधील प्रमुख कलाकार अथर्व (तरूण आंबेडकर), नारायणी महेश वर्णे (रमाबाई) आणि रामजी सकपाळ (जगन्नाथ निवंगुणे) भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांची आठवण काढत समाजाप्रती त्यांनी दिलेल्या प्रचंड योगदानाबाबत सांगत आहेत. मालिकेमध्ये तरूण आंबेडकरांची भूमिका साकारणारा अथर्व म्हणाला, “डॉ. बी. आर. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे संस्थापक आहेत. ऑगस्ट १९४७ मध्ये विद्वान म्हणून त्यांच्या ख्यातीमुळे ते भारताचे पहिले कायदा मंत्री आणि नंतर संविधानाचा मसुदा तयार करणार्या समितीचे अध्यक्ष बनले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर दूरदर्शी होते, ज्यांचा
वारसा अतुलनीय आहे. त्यांचा विश्वास होता की "एक राष्ट्र, एक संविधान" ही एकसंध संहिता भारतात राष्ट्रीय एकात्मता आणि स्थिरता वाढवू शकते. संविधान लिहिताना त्यांनी धार्मिक, लिंग व जातीय समानतेवर भर दिला. देशाची एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी वर्गातील फूट दूर करणे महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत होते आणि त्यांनी नेहमीच समान संधीला प्राधान्य दिले.’’
रामजी सकपाळची भूमिका साकारणारे जगन्नाथ निवंगुणे म्हणाले, “डॉ. आंबेडकर हे सर्वोत्तम नेता होते. समाजाप्रती त्यांनी दिलेले योगदान पाहता त्यांच्या दर्जाचे कोणतेही व्यक्तिमत्त्व त्यांच्याशी तुलना करू शकत नाही. त्यांच्या कार्याने सर्व भारतीयांच्या जीवनावर परिणाम केला आहे; त्यांचे अमाप ज्ञान व दृष्टिकोन पाहता त्यांची संविधान सभेचे सदस्य, पहिले कायदा मंत्री आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सामाजिक न्यायाशिवाय सामाजिक एकता आणि राष्ट्रीय एकात्मता साधता येणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी सामाजिक लोकशाहीचा प्रचार केला. डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित समाजाची कल्पना केली. अनेकांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी थोर दृष्टिकोन व विश्वास लागतो. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याप्रमाणेच कार्य करत इतर नेते देशाला एकत्र करू शकतील.” रमाबाईची भूमिका साकारणाऱ्या नारायणी महेश वर्णे म्हणाल्या, ‘’डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी लाखो भारतीयांना एक राष्ट्र व एक संविधानाच्या कक्षेत आणून अखंड भारताचा पाया घातला. आजही त्यांची शिकवण आणि तत्त्वज्ञान देशभरातील भारतीयांना प्रेरित करते. आपल्या संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबांनी भारतातील महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यांचे संरक्षण व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अनेक धोरणे अंमलात आणली. त्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांच्या उच्च सहभागाची कल्पना मांडली आणि भारतीय
महिलांना कायदेशीररित्या घटस्फोटासाठी मतदान करण्याचा व मालमत्तेची मालकी देण्याचा मार्ग मोकळा केला. त्यांनी हिंदू विवाह कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा, पालकत्व कायदा आणि हिंदू कोड बिल लागू करत महिलांच्या हक्कांसाठी आवाज दिला. त्यांनी महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यास प्रोत्साहित केले.’’
