रतिश रातुसारीया, डॉ. गणेश गवाली, सतेश परांजपे, प्रितेश निंबाळकर, सचिन इंदुलकर यांची आगेकूच
सोलारीस करंडक वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
पुणे : सोलारीस क्लब तर्फे आयोजित चौथ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रतिश रातुसारीया, डॉ. गणेश गवाली, सतेश परांजपे, प्रितेश निंबाळकर, सचिन इंदुलकर, रवि जैस्वाल, गौरव अगरवाल, रणजीत परदेशी आणि कल्पेश मंकनी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत रतिश रातुसारीया याने संदीप चोरडीया याचा ८-० असा सहज पराभव केला. अजय देशमुख याने रोहन राठी याचा ८-० असा सहज पराभव केला. डॉ. गणेश गवाली याने नरेशकुमार अरोरा याचा ८-४ असा तर, रवि जैस्वाल याने आशिष शेलार याचा ८-१ असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचे औपचारीक उद्धघाटन सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते झाले. यावेळी रविंद्र पांड्ये टेनिस अॅकॅडमी (आरपीटीए) चे रविंद्र पांड्ये, क्लबचे राजेश सकपाळ, सहभागी खेळाडू आदि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकालः पात्रता फेरीः
रतिश रातुसारीया वि.वि. संदीप चोरडीया ८-०; अजय देशमुख वि.वि. रोहन राठी ८-०;
डॉ. गणेश गवाली वि.वि. नरेशकुमार अरोरा ८-४; रवि जैस्वाल वि.वि. आशिष शेलार ८-१;
संतेश परांजपे वि.वि. आनंद कुलकर्णी ८-१; गौरव अगरवाल वि.वि. किर्ती काळे ८-३;
प्रितेश निंबाळकर वि.वि. कार्तिकेयन पी. ८-२; रणजीत परदेशी वि.वि. अतुल सरदेसाई ८-५;
सचिन इंदुलकर वि.वि. अमर बिडकर ८-७(२); कल्पेश मंकनी वि.वि. दर्शन गुप्ता ८-१;
