Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

‘कोन्निचिवा पुणे २०२२’ दरम्यान पुणेकरांनी अनुभविली ​जपानी संस्कृती

पुणे : ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ दरम्यान पुणेकरांनी अनुभविली ​जपानी संस्कृती

टी सेरेमनी
निवांतपणे चहाचा आस्वाद घेण्यासाठी जगभरात अनेक पद्धती असून जपानी पारंपरिक टी सेरेमनी ही त्यातलीच एक पद्धत. निगुतीने उकळलेले पाणी आणि त्यात प्रेमाने उगाळून घातलेला ग्रीन टी संध्याकाळच्या चहाच्या वेळेची रंगत ख-या अर्थाने वाढवतो. हाच अनुभव आज पुणेकरांनी घेतला. निमित्त होते विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी येथे इंडो जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या महोत्सवाचे. प्रसिद्ध टी सेरेमनी मास्टर कजुको बरिसिक यांनी यावेळी टी सेरेमनीची झलक उपस्थितांना दाखविली.

आपण आज भेटत असलेल्या व्यक्तीला पुन्हा भेटू किंवा नाही याची अनिश्चितता असताना पहिल्याच वेळेस त्यांचे सर्वोत्तम आदरातिथ्य व्हावे, या भावनेने जपानमध्ये सदर टी सेरेमनी पारंपरिक पद्धतीने सुरू असल्याचे कजुको बरिसिक यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईचे मुख्य काउंसिल तोशिहिरो कानेको, जपानी योग तज्ज्ञ अकिको कातो, आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, ओंकार बारी, प्रशांत खिंवसरा आदी या वेळी उपस्थित होते.

 – इकेबाना
जपानमध्ये फुलांची सजावट करण्याच्या खास पद्धती आहेत, त्यातलीच एक पद्धत म्हणजे इकेबाना. ही फुलांची सजावट आज पुणेकरांना पहायला मिळाली. निमित्त होते विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी येथे इंडो जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या महोत्सवाचे. ज्यापद्धतीने आपल्याकडे गायन वादनाची घराणी असतात तशाच पद्धतीने जपानमध्ये फुलांची ही पारंपरिक सजावट करण्याच्या पद्धती आहेत. या सजावटी संदर्भात उपस्थितांना माहिती देताना इकेनोबो इकेबाना पुणे शाखेच्या अरुंधती देशपांडे. पुण्यातील अनेक कलाकारांनी यामध्ये आपली फुलांची सजावट सादर केली.

 – अकिको कातो
विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी येथे इंडो जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या संस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जपानी योग तज्ज्ञ असलेल्या अकिको कातो यांनी उपस्थितांना योग संदर्भात मार्गदर्शन केले. अकिको या स्वत: किओ विद्यापीठामध्ये एन्व्हार्नमेंट अँड इन्फर्मेशन स्टडीज विभागाच्या व्याख्यात्या असून २०१५ साली मिस वर्ल्ड जपान स्पर्धेत विशेष पारितोषिक विजेत्या देखील आहेत. त्यांनी आजवर योग तज्ज्ञ म्हणून जपानी संरक्षण दलातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षित केले आहे. शिवाय अनेक सरकारी अधिकारी-कर्मचारी व सुमो रेसलर्स यांनाही प्रशिक्षित केले आहे.


 – फुमी नेगिशी
विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी येथे इंडो जपान बिझनेस काउंसिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्स्यूलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने ‘कोन्निचिवा पुणे २०२२’ या संस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुमी नेगिशी या जपानी गायिकेने भारतीय शास्त्रीय संगीताच्या रचना उपस्थितांसमोर सादर केल्या. त्यांनी सादर केलेल्या सावरे आई जइयो या रचनेने उपस्थितांची वाह वाह मिळविली.

नेगिशी या भारतीय शास्त्रीय संगीताच्या आवडीने १९९७ साली भारतात आल्या होत्या. २०१५ पासून इंडियन काउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) शिष्यवृत्ती अंतर्गत त्यांनी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गुरु डॉ. प्रभा अत्रे यांकडे संगीताचे शिक्षण घेतले आहे. शिवाय डॉ. अत्रे यांच्या ‘एन्लायटनिंग दी लिसनर’ या पुस्तकाचे जपानी भाषांतर देखील त्या करीत आहेत.

दरम्यान, आज (रविवार) सायंकाळी ४ वाजल्यानंतर सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. जपानी खाद्यसंस्कृती सोबतच जपानी आर्ट कॉर्नर आणि भारत-जपान या दोन्ही देशातील सांस्कृतिक देवाण घेवाण यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम हे महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading