मुक्त व दूरस्थच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशास मुदतवाढ
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बीए, बी.कॉम, एम.ए, एम.कॉम या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी याआधी १५ नोव्हेंबर २०२२ ही मुदत देण्यात आली होती. आता ही प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्यात आली असून दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ सकाळी ११ वाजेपर्यंत विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या प्रवेशाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
