Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

श्रद्धा खून प्रकरणी दोषी आफताब ला  फाशी देण्यात यावी- राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसची मागणी

पुणे :दिल्ली येथे श्रद्धा खून प्रकरणी दोषी आफताब विरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने लाल महाल येथील जिजामाता चौकात आंदोलन करण्यात आले

.या आंदोलन प्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालीनी वाणी म्हणाल्या ” गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला धर्म.पंथ,जात यांची जोड देवून राजकारण करणं आवश्यक नाही, दोषी हा कोणत्या धर्माचा आहे यापेक्षा त्याने केलेले कृत्य किती गंभीर आहे हे पाहून त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे तसेच दोषी आफताब विरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी त्याचप्रमाणे या गोष्टीचे राजकारण करून काही लोक धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला.सदरचे आंदोलन पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख,शारदा  ओरसे, सारिका पारेख, मीना पवार, ज्योती सूर्यवंशी,, भावना पाटील, राजेश्वरी पाटील, शशिकला कुंभार,दिलशाद अत्तार, वसुधा निर्भावणे, रुपाली बिबवे, सोनाली उजागरे, मनीषा होले, प्रभावती भूमकर,पूजा काटकर, मंजुषा दौंडकर, योगिता गोसावी, संगिता भालेराव,नीता गायकवाड,वनिता नलावडे,सुगंधा तिकोने,सुलभा सांडभोर, धनश्री कराळे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading