कीर्तिकर यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चा 2 महिन्यांपासून होत्या – अंबादास दानवे
पुणे:खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत.गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चा 2 महिन्यांपूर्वी होत्या .गजानन कीर्तिकर ज्येष्ठ नेते त्यांच्यावर मी टीका करणार नाही.कीर्तिकरांना पक्षानं 5 वेळा आमदार 2 वेळा खासदार केलं. अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर केली.
दानवे म्हणाले,उध्दव ठाकरेंनी ठरवलं असतं तर शिंदे गटात जाण्यापासून 50 ते 60% लोकं आमच्यासोबत असते. असे अंबा साहेब दानवे म्हणाले.
दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांनी हिंदी गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला एक मोठा धक्का बसला.शिंदे गटाकडून खालच्या पातळीवरील राजकारण सुरू आहे.दसरा मेळाव्यानंतर जयदेव ठाकरे यांना शिंदे गटानं कोणत्याही विषयावर विचारात घेतलं नाही. अशी टीका दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात भरपूर प्रतिसाद भेटत आहे .त्यावर दानवे म्हणाले,
सध्या भारतातील लोकशाही धोक्यात आहे.लोकशाही वाचविण्यासाठी राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ अख्या देशभर फिरत आहे असे दानवे म्हणाले. शिंदे गटातील 16 आमदार च्या अपात्र विषयी अजूनही सुप्रीम कोर्टात प्रश्न प्रलंबित आहे.16 आमदार अपात्र होणारच. असे दानवे म्हणाले.
