सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे उपविजेतेपद पटकावले.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने बुधवारी राहुरी येथे झालेल्या १८ व्या ‘इंद्रधनुष्य -२०२२’ या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे उपविजेतेपद पटकावले.
५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रंगलेल्या या महोत्सवात पुणे विद्यापीठाच्या ४० विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. या संघाने संगीत, साहित्य, ललित कला, नाट्य आणि नृत्य या मुख्य कलाप्रकारांमधील १५ विविध कलाप्रकारांमध्ये आपला ठसा उमटवला.
या कलाप्रकारांमधील पारितोषिकांसह विद्यापीठाने महोत्सवातील संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपदही पटकावले. पुणे विद्यापीठाच्याच अथर्व वैरागकर याला ‘इंद्रधनुष्य-२०२२’ चा ‘गोल्डन बॉय’ म्हणूनही गौरविण्यात आले. पुणे विद्यापीठाची स्पर्धेतील एकूण कामगिरी विचारात घेत या महोत्सवाचे उपविजेतेपदावरही विद्यापीठाने आपले नाव अंकित केले आहे.
१८ वा इंद्रधनुष्य २०२२ राज्यस्तरीय युवा महोत्सव
शास्त्रीय गायन – प्रथम
शास्त्रीय सुरवाद्य – प्रथम
वेस्टर्न व्होकल सोलो – प्रथम
भारतीय समूहागीत – प्रथम
एकांकिका – प्रथम
कोलाज – प्रथम
वेस्टर्न ग्रुप सॉंग – द्वितीय
नाट्यसंगीत – द्वितीय
वक्तृत – द्वितीय
पोस्टर – द्वितीय
रांगोळी – द्वितीय
शास्त्रीय तालवाद्य – तृतीय
वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल – तृतीय
स्पॉट पेंटिंग – तृतीय
इंस्टॉलेशन – तृतीय
गोल्डन बॉय – पुणे विद्यापीठ
संगीत विभाग – चॅम्पियनशीप
सर्वसाधारण उपविजेतेपद – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे
