Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘एकदम कडक’ चित्रपटाचा टिझर सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ

‘एकदम कडक’ चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार” या डायलॉगने तर सर्वत्र धुमाकूळच घातलाय असे म्हणायला हरकत नाही. ‘प्रेम बीम काय नाय बरं का’ पासून ते ‘प्रेम एकदम कडक हाय’ पर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहणे विशेष ठरणार आहे. तरुण कलाकारांच्या जोडीला ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार आहे हे टिझर वरूनच कळतंय. तर एकदम कडक म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींच्या कामाची पोचपावती टिझरवरून येतेय.  ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत एकदम कडक चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या टिझरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली असून येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.
 ‘ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले आहे. तर गीतकार म्हणून मंगेश कांगणे आणि गणेश शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी सुरबद्ध केली आहेत. हा चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला असून चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.
 येत्या २ डिसेंबरला एकदम कडक चित्रपटातील कलाकार एकदम कडक असा काय धुडगूस घालणार हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading