Thursday, May 28, 2026
BusinessLatest NewsPUNE

शिवणे इंडस्ट्रीज असोशिएशन आणि रामेलेक्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ZED  प्रमाणपत्र बाबत माहिती आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 

पुणे :  शिवणे इंडस्ट्रीज असोशिएशन आणि रामेलेक्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या झीरो डीफेक्ट, झीरो इफेक्ट ( ZED)  प्रमाणपत्र बाबत माहिती आणि मार्गदर्शनचे आयोजन आज (शुक्रवार) करण्यात आले आहे. रामेलेक्स प्रा. लि. ही विद्युत विभागात ZED प्रमाणपत्र  मिळविणारी भारतातील पहिली कंपनी आहे, त्यांच्या प्रमाणपत्राचे वितरण सुद्धा या प्रसंगी करण्यात येणार आहे अशी माहिती रामेलेक्स प्रा. लि. चे सोनल भाटे आणि हृषीकेश भिसे यांनी दिली. 

शुक्रवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत रामेलेक्स ऑडोटोरियम हॉल, शिवणे येथे  आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात Ministry OF MSME and QCI चे विरेन्द्र इंगळे आणि युवराज जांभळे ZED प्रमाणपत्रांचे महत्व आणि आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेलेक्स प्रा. लि. चे चेअरमन राम बाबारावजी जोगदंड असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या उद्योग विभागाचे संचालक सदाशिव सुरवसे उपस्थित राहणार आहेत. हा विशेष सोहळा अखिल अरुण घोंगरे (जॉइंट डायरेक्टर इंडस्ट्रीज हेल्थ अँड सेफ्टी), रामराव वाघ (आयपीएस), डी. एस. हाके (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे), चंद्रशेखर मोरे (मॅजिक स्ट्रक्चर शिवणे), संजय भोर (अध्यक्ष शिवणे इंडस्ट्रीज असोशिएशन), अविनाश माणिकराव जोगदंड ( उपाध्यक्ष, शिवणे इंडस्ट्रीज असोशिएशन ) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

या कार्यक्रमात  शिवणे इंडस्ट्रीज  असोशिएशन सह इतर भागातील लघु, मध्यम उद्योजकांनी सहभागी व्हावे आणि ZED प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन सोनल भाटे आणि हृषीकेश भिसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading