Thursday, May 28, 2026
BusinessLatest NewsTECHNOLOGY

‘वी’ने नवे वी मॅक्स प्लॅन्स सादर करून भारतात पोस्टपेड सेवासुविधांची नवी व्याख्या रचली

भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन आयडियाने वी मॅक्स हे देशातील सर्वोत्तम व्हॅल्यू पोस्टपेड प्लॅन्स सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. डिजिटल युगातील मोबाईल ग्राहकांच्या बदलत्या गरजा ध्यानात घेऊन यामध्ये दिला जात आहे अधिक जास्त डेटा,अधिक जास्त नियंत्रण, अधिक जास्त सुविधा आणि अतुलनीय कन्टेन्ट सेवा.

वी मॅक्स हे नाव अगदी सार्थ ठरवत या प्लॅन्समध्ये आधीच्या पोस्टपेड प्लॅन्सच्या किमतीला अधिक जास्त मूल्य दिले जात आहे.

ज्यांना सर्वोत्तम सेवासुविधा हव्या आहेत अशांसाठी सादर आहेत नवे वी मॅक्स प्लॅन्स

·         अधिक जास्त डेटा आणि एसएमएस कोटा

·         अधिक जास्त ओटीटी मनोरंजन

·         विशेष तयार करण्यात आलेल्या ऑफर्स

·         बिलिंगवर अधिक जास्त नियंत्रण

·         प्रायॉरिटी कस्टमर सर्व्हिस

·         इंटरनॅशनल रोमिंग व ट्रॅव्हलचे लाभ    नव्या वी मॅक्सबद्दल वोडाफोन आयडिया लिमिटेडचे सीएमओ श्री अवनीश खोसला यांनी सांगितले,”युजर्सच्या बदलत्या गरजा आणि महत्त्वाकांक्षांना अनुसरून आम्ही आमच्या सेवासुविधा व उत्पादनांमध्ये सातत्याने नावीन्य सादर करत असतो. वी मॅक्ससोबत आमचा पोस्टपेड पोर्टफोलिओ मजबूत करून आम्ही हाय एआरपीयू पोस्टपेड युजर्सना ५जीसाठी सुसज्ज वी नेटवर्ककडे आकर्षित करू इच्छितो, त्यामध्ये आम्ही त्यांना अधिक जास्त शक्ती, मूल्य आणि सुविधा प्रदान करत आहोत. डोमेन तज्ञांसोबत सखोल भागीदारीतून तयार करण्यात आलेल्या अनोख्या डिजिटल सेवासुविधांचा एक मोठा संच आता सर्व वी मॅक्स पोस्टपेड युजर्सना उपलब्ध होणार आहे, ज्याचा लाभ घेऊन ते या डिजिटल युगात अधिकाधिक चांगली कामगिरी बजावू शकतील.”

नवे वी मॅक्स प्लॅन्स संपूर्ण देशभरात १ नोव्हेंबर २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत.  सध्याचे आणि नवे सर्व वी पोस्टपेड युजर्स या प्लॅन्सचा लाभ घेऊ शकतील.

वी मॅक्स प्लॅन्सची ठळक वैशिष्ट्ये:

अधिक जास्त डेटा आणि एसएमएस – आता वी च्या ग्राहकांना अधिक जास्त डेटा कोटाचा आनंद घेता येईल.  त्यासोबत त्यांना मिळेल वीची अतिशय लोकप्रिय नाईट अनलिमिटेड सुविधा. यामुळे वीच्या ५जी रेडी नेटवर्कचा मनमुराद आनंद व लाभ युजर्सना मिळवता येईल. वी मॅक्स प्लॅन्समध्ये दर महिन्याला ३००० एसएमएसची सुविधा देखील मिळत आहे.   

व्हॉइस आणि डेटा यांच्या व्यतिरिक्त मनोरंजन, प्रवासामध्ये डिस्काउंट्स, एअरपोर्ट लाउंज ऍक्सेस असे खूप जास्त लाभ मिळवता येतील – वी मॅक्स पोस्टपेड प्लॅन्समध्ये मनोरंजनाची भरगच्च मेजवानी सादर करण्यात आली आहे, वी मुव्हीज अँड टीव्हीबरोबरीनेच सोनीलिव, ऍमेझॉन प्राईम, डिस्ने+हॉटस्टार यांच्या मोफत सबस्क्रिप्शन मिळवता येतील. हंगामाची तब्बल २० भाषांमधील गाण्यांची प्रचंड मोठी लायब्ररी वी म्युझिकमध्ये उपलब्ध आहे, ऍड-फ्री म्युझिकची ही सुविधा वी मॅक्स युजर्सना वापरता येईल. वी ऍपवर वी गेम्समार्फत १००० पेक्षा जास्त गेम्सचा आनंद घेता येईल. वी मॅक्स प्लॅन्समध्ये मेकमायट्रिपमार्फत विमान व हॉटेल बुकिंग्सवर डिस्काऊंट्स मिळवता येतील. दरवर्षी २९९९ रुपयांचा ७ दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग पॅक आणि डोमेस्टिक व इंटरनॅशनल एअरपोर्ट लाऊंजेसमध्ये कॉम्प्लिमेंटरी ऍक्सेस हे सर्व लाभ नव्या रेडएक्स ११०१ प्लॅनमध्ये मिळत राहतील.

मासिक बिलांवर अधिक जास्त नियंत्रण – आता वी युजर्स वी ऍपमार्फत त्यांचे स्वतःचे क्रेडिट लिमिट सेट करू शकतील. त्यामुळे त्यांना त्यांच्या मासिक खर्चांवर अधिक जास्त नियंत्रण मिळवता येईल.  

प्रायॉरिटी कस्टमर सर्व्हिस – सर्व वी मॅक्स पोस्टपेड प्लॅन युजर्सना वी स्टोर्समध्ये प्रायॉरिटी सर्व्हिसचा लाभ मिळवता येईल. कस्टमर केयरमध्ये त्यांचे कॉल २० सेकंदात उचलले जातील आणि त्यांच्या प्लॅन प्रकारानुसार त्यांना थेट कस्टमर केयर एक्झिक्युटिव्हशी बोलता येईल.  

वी मॅक्स पोस्टपेड प्लॅन्सवर एक दृष्टिक्षेप

फॅमिली प्लॅन्स: ‘वी’ने आपले फॅमिली प्लॅन्स देखील अपग्रेड केले आहेत. यामध्ये ९९९ रुपयांना ४ कनेक्शन्स व ११४९ रुपयांना ५ कनेक्शन्स देण्यात येत आहेत.  त्यासोबत ऍमेझॉन प्राईम व डिस्ने+हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शन देखील दिल्या जात आहेत.  

‘वी’ च्या नव्या पोस्टपेड प्लॅन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया येथे लॉग ऑन करा  https://www.myvi.in/vi-max-postpaid

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading