वाहतूक कोंडी वरून दोन आयुक्तांनी केलेला पत्रव्यवहार हा कागदावर आला आहे त्यावर विचार करू -चंद्रकांत पाटील
पुणे:पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करा, तरच वाहतूक कोंडी कमी होईल, अशी सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना केल्यावर प्रचंड गदारोळ झाला.
दोन्ही आयुक्तांमध्ये वाद असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे नसल्याचे स्पष्ट केले. वाहतूक कोंडीचे समर्थन करणार नाही परंतु परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घ्याव्या लागतील, दोन आयुक्तांनी केलेला पत्रव्यवहार हा कागदावर आला आहे त्यावर विचार करू.असे भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले,महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्यात काहीही वाद नाही. सरकारी कामात काही बाबी सांगण्यासाठी त्या कागदावर आणाव्या लागतात. तसे त्यांनी केले आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस आयुक्तांना काही पर्याय सुचले आहेत. ते त्यांनी कागदावर मांडले आहेत. गेल्या बैठकीत पुण्यातील ४०० किलोमीटर रस्त्यांच्या कामांबाबत ठरले आहे. त्यानुसारच पोलीस आयुक्तांनी हे विषय पत्रातून मांडले आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे अंमलबजावणीसाठी पत्र पाठवले आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बीआरटी मार्ग बंद करावा अशी सूचना केली आहे. त्यावर पाटील म्हणाले, “पुण्यातील वाहतूक कोंडीचे समर्थन करणार नाही. मुंबईतही वाहतूक कोंडी ही विविध विकास कामांमध्ये होत आहे. पुण्यातही मेट्रो, जायका, पाइपलाइनने गॅस असे प्रकल्प सुरू आहेत. विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामामुळे सहा लेनचा रस्ता तीन लेनचा झाला आहे. त्यामुळे कोंडी होत आहे. हे वाहतूक कोंडीचे समर्थ नाही. यावर उपाय म्हणून काय करणार आहोत याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, परिस्थितीमुळे तयार झालेली कोंडी लक्षात घ्यायला हवी. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मंत्रालयात संभाजी भिडे भीमा कोरेगाव केस मधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व यांनी महिला पत्रकाराला तू कपाळावर कुंकू लावला नाही टिकली लावली नाही म्हणून तिला अपमानित केले. त्यामुळे सामाजिक संस्थां सह विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यावर पाटील म्हणाले,भिडे गुरुजींनी असं का भाष्य केले हे त्यांनाच विचारा.तुम्ही अनावश्यक एकमेकांवर चिखल फेकणारी विधान दाखवणे बंद करा. असेही चंद्रकांत पाटील पत्रकारांना म्हणाले.
