Thursday, August 27, 2026
Latest NewsMAHARASHTRA

‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई : सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित गतीनिर्णयांची प्रगती महाराष्ट्राची या पुस्तिकेचे मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

‘शंभर दिवस सेवेचे, समर्पणाचे, प्रामाणिकतेचे आणि वचनबद्धतेचे’ अशी या पुस्तिकेची संकल्पना आहे. या पुस्तिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनोगतासह शंभर दिवसांच्या वाटचालीत घेण्यात आलेल्या लोकाभिमुख आणि महत्वपूर्ण अशा निर्णयांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

कृषी, सहकार, पणन, ग्रामविकास, पशुसंवर्धन-दुग्ध व मत्स्य व्यवसाय, पाणीपुरवठा व स्वच्छता, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यापासून ते गृह, उद्योग, नगरविकास, परिवहन, पर्यटन, वने, ऊर्जा, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा, महसूल, वित्त व नियोजन आणि सामान्य प्रशासन अशा सर्वच विभागांच्या महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading