Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

ए. के. स्पोर्ट्स संघाचा पहिला विजय; गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाचा सलग दुसरा विजय !!

पुणे : क्रिक् चॅलेंजर्स आणि ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘पी. एन. सुरतवाला करंडक’ (कै. श्रीमती पुष्पाबेन नटवरलाल सुरतवाला) १५ वर्षाखालील मुलींच्या ५०-५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत ए. के. स्पोर्ट्स संघाने पहिला तर, गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाने सलग दुसरा विजय मिळवत आगेकूच केली.

येवलेवाडी येथील ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि व्हेरॉक क्रिकेट अ‍ॅकॅडमी-थेरगांव मैदानांवर झालेल्या सामन्यात प्रांजली पिसे हिच्या शतकी खेळीच्या जोरावर ए. के. स्पोर्ट्स क्लब संघाने आर्यन्स् क्रिकेट क्लबचा ९६ धावांनी सहज पराभव केला. प्रांजली पिसे (१०० धावा) आणि अमानी नदाल (५१ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर ए. के. स्पोर्ट्स क्लबने २८५ धावांचे आव्हान उभे केले. प्रांजली आणि अमानी यांनी १५० चेंडूत १६५ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या आव्हानाला उत्तर देताना आर्यन्स् क्रिकेट क्लबचा डाव १८९ धावांवर मर्यादित राहीला. समिका कौशल हिने एकहाती ७८ धावांची खेळी केली पण, विजय ९६ धावांनी दुरच राहीला.

शिवांशी कपूर हिच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाने सांगली गर्ल्स संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. निधी शांभवानी (३९ धावा), कृष्णा सागरे (२० धावा) आणि सह्यांद्री कदम (२१ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर सांगली गर्ल्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६८ धावांचे आव्हान उभे केले. गॅरी कर्स्टन संघाकडून शिवांशी कपूरने ३२ धावांत ५ गडी बाद करून निम्मा संघ बाद केला. हे आव्हान गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया संघाने १९.२ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. इरा जाधव हिने नाबाद १०१ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ए.के. स्पोर्ट्स क्लबः ४६ षटकात ४ गडी बाद २८५ धावा (प्रांजली पिसे १०० (९५, १५ चौकार), अमानी नदाल ५१ (७९, ७ चौकार), रिशिमा गोस्वामी ३४, तनवी पाटील नाबाद २९);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी प्रांजली आणि अमानी १६५ (१५०) वि.वि. आर्यन्स् क्रिकेट क्लबः ४६ षटकात ५ गडी बाद १८९ धावा (समिका कौशल ७८ (११७, १० चौकार), आर्या उमप ३६, आर्या शेवाळे २१, प्रांजली पिसे ३-४३); सर्वोत्तम खेळाडूः प्रांजली पिसे;

सांगली गर्ल्सः ३८.१ षटकात १० गडी बाद १६८ धावा (निधी शांभवानी ३९, कृष्णा सागरे २०, सह्यांद्री कदम २१, शिवांशी कपूर ५-३२, साई चव्हाण ३-३२) पराभूत वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडियाः १९.२ षटकात २ गडी बाद १६९ धावा (इरा जाधव नाबाद १०१ (६८, १८ चौकार, १ षटकार), रिशिका कृष्णन १७); सर्वोत्कृष्ट खेळाडूः शिवांशी कपूर;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading