Saturday, August 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पवार कुटुंबीयांची भाऊबीज:आठ बहिणींनी केले अजित पवार यांचं एकत्र औक्षण

बारामती:कोविड काळानंतर दिवाळी आख्या देशात मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे.भाऊबीज निमित्त पवार कुटुंबिय बारामतीच्या काटेवाडीमधल्या त्यांच्या घरी एकत्र आलं होतं. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह आठ बहिणींनी अजित पवारांचं औक्षण केलं.
आठ बहिणींनी अजितदादांच एकत्र औक्षण केलं, पण त्यांनी फक्त सुप्रिया सुळे यांनाच ओवाळणी दिली. तुमच्या सगळ्यांची ओवाळणी सुप्रिया सुळे यांच्याकडे देत असल्याचं अजित पवार त्यांच्या बहिणीला म्हणाले.
राज्याच्या राजकारणात कायमच व्यग्र असणारं पवार कुटुंब दिवाळीच्या निमित्ताने आवर्जुन बारामतीमध्ये एकत्र येतं.यावेळीही पवार कुटुंबाने उत्साहामध्ये दिवाळीचा सण साजरा केला.
दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाच्या सगळ्या पिढ्या एकत्र येऊन सण उत्साहात साजरा करत असतात

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading