Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

‘स्वर झंकार’ने धायरीतील ग्रामस्थ मंत्रमुग्ध

पुणे : भूपाळी, तुकोबाचे अभंग, भक्तीगीते भावगीतांचा रंगलेली पहाट धायरीकरांसाठी विशेष ठरली, निमित्त होते माजी नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे व किशोर दत्तात्रय पोकळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर झंकार’चे…!!

धायरी येथील रायकर मळ्यातील लक्ष्मी विहार सोसायटीत असणाऱ्या मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पं. रवींद्र यादव ( बहुलीकर), सुहानी गायकवाड, अमृता यादव, तेजल कुलकर्णी, प्रकाश सुतार, सुधीर कदम, अनिकेत यादव (तबला) यांनी आपल्या सुरेख स्वरांनी पहाट स्वरमयी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमी लायगुडे यांनी केले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, दर्शन दे रे भगवंता, ऐरणीच्या देवा, माझे माहेर पंढरी, अशा विविध रचना सादर करताना कलाकारांनी आजची पहाट मंगलमय केली.

कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष असून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते, यामुळे या कलाकारांना देखील आपली कला आपल्या लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळते, हीच हा दिवाळी पहाटचे वैशिष्ट म्हणता येईल, असे अश्विनी पोकळे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading