Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पवार कुटुंबीयांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबाग गजबजली

बारामती:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज बारामतीत दिवाळीचा उत्सव साजरा केला. पवारांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती त्यांच्या बारामतीतील दोन वर्षाच्या कालखंडानंतर पवार कुटुंबीयांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी गोविंदबाग या निवासस्थानी पाहायला मिळाली.
यावेळी शरद पवार यांच्याव्यतिरिक्त विरोधी पक्षनेते अजित पवार , सुप्रिया सुळे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार , पार्थ पवार यांचीही व्यासपीठावर उपस्थिती पाहायला मिळाली.
उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन पवार कुटुंबीय पारंपरिक पद्धतीनं पाडवा आणि भाऊबीज साजरा केला. यावेळी पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी सानथोरांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. फोटो म्हणू नका किंवा आपलेपणानं केलेली विचारपूस म्हणू नका. पवार कुटुंबाचं त्यांच्या कार्यकर्त्यांशी असणारं अनोखं नातं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळालं. रक्ताचं नातं नसतानाही, मनानं जोडलेलं नातं जपणारी ही माणसं पाहता शरद पवारांचा परिवार किती मोठा आहे याचा अगदी सहज अंदाज यावेळी आला.
यावेळी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यासाठी राज्यातील ‘व्हीआयपी’ देखील रांगेत होते. आमदार दत्तात्रय भरणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार यशवंत माने, आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार रमेश थोरात आदी बड्या नेत्यांनी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading