fbpx
Monday, May 27, 2024
Latest NewsPUNE

केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च
व सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

पुणे : केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. याद्वारे संशोधन, तज्ज्ञ मार्गदर्शन व तांत्रिक उपक्रमात भागीदारी वाढविण्यात येणार आहे.

सीओईपी टेक येथे पार पडलेल्या कार्यक्रमात केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव व सीओईपीचे कुलगुरू डॉ. एम. एस. सुतावणे यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी केजे शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला, प्राचार्य डॉ. सुहास खोत यांच्यासह सर्व विभागप्रमुख डॉ. एस. के. पाटील, डॉ. संजय खोंडे, डॉ. प्रमोद चव्हाण, डॉ. प्राजक्ता देशमुख, डॉ. निकिता कुलकर्णी, प्रा. गायत्री पाटील, सीओईपी टेकच्या वतीने कॉर्पोरेट रिलेशन ऑफिसर डॉ. संदीप मेश्राम उपस्थित होते.

कल्याण जाधव म्हणाले, “हा सामंजस्य करार विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप मदत करेल. गेल्या तीन वर्षात एफडीपी, अतिथी व्याख्यान, तज्ञांची व्याख्याने, विद्यार्थ्यांना द्वारे आभासी प्रयोगशाळांचा वापर, सीओईपी टेक येथील प्रयोगशाळांना विद्यार्थ्यांच्या भेटी यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.”

सामंजस्य कराराचे फायदे

  • विविध शैक्षणिक, व्यावसायिक उपक्रम, नवकल्पना राबवणे
  • प्रयोगशाळा, संशोधन केंद्रसक्षम होईल
  • तज्ज्ञ मार्गदर्शक, उद्योग प्रायोजित सल्लागारांची उपलब्धता
  • विद्यार्थी-प्राध्यापकांच्या सर्वांगीण विकासास मदत
  • पायाभूत सुविधांचा वापर, सकारात्मक वातावरण व सहयोगी संशोधन प्रकल्प
  • सहयोगी कार्यातून निर्माण होणारी प्रकाशने संयुक्तपणे प्रकाशित होतील
  • एनईपी २०२० व सीबीसीएस प्रणालीची यशस्वी अंमलबजाणी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading