Sunday, October 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी

पुणे :दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक गावि जायला व फिरायला घराबाहेर पडत असल्याने. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली आहे.
खालापूर टोल नाका व बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच खालापूर टोलनाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर सलग दुसऱ्या दिवशी बोरघाटात अमृतानजन पुलाजवळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीचा हा परिणाम असून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या घराकडे निघाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading