वादकांनी वादन करुन गोळा केला २ हजार किलो धान्यरुपी जोगवा
पुणे : शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ कृत विघ्नहर्ता वाद्य पथक यांच्या ‘धान्यरूपी जोगवा’ या उपक्रमांतर्गत उत्सवकाळात विविध ठिकाणी वादन करून २ हजार किलो धान्यरूपी जोगवा गोळा करण्यात आला. हा धान्यरुपी जोगवा विजय फळणीकर यांच्या सिंहगड येथील उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या ‘आपलं घर ‘ या संस्थेला देण्यात आला.
नंदा रेणुका, सचिन गायकवाड, विद्या मोहिते, श्रावणी काकडे, निधी पोटे, प्रथमेश पिसे, सुमित आष्टीगे, सिद्धेश्वर दळवी, प्रवेश पिसे, किरण पतंगे, विराज मोहिते, वृषाली मोहिते यांनी उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. विघ्नहर्ता वाद्यपदकातील वादकांकडून संस्थेमध्ये गुरु-भजन सेवा यावेळी रुजू करण्यात आली.
गहू ,तांदूळ, ज्वारी ,बाजरी ,रवा साखर, गुळ ,चहा पावडर, पीठ तेलाचे डबे, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, तुरीची डाळ, हरभरा डाळ, लापशी, मसूर डाळ पोहे, केळी बॉक्स ,बिस्कीटचे बॉक्स असे एकूण २ हजार किलो धान्य देण्यात आले.
‘आपलं घर ‘ या संस्थेचे हाॕस्पिटल असून तिथे स्त्रियांचे ब्रेस्ट कँन्सरचे आॕपरेशन्स् कमी दरात केले जातात. तसेच पेशंट व एक नातेवाईक यांना फक्त नाममात्र रु. १०/- मध्ये जेवण दिले जाते. त्यामुळे धान्याची मदत करण्यात आली.
