दिवाळी 2022 : या दिवाळीतील शुभ मुहूर्त कोणते?
पुणे : दिवाळी हा सर्व सणांचा राजा असून याला दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा असा स्वतंत्र मुहूर्त नसतो, प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतरच्या अडीच तासांमध्ये लक्ष्मीपूजन करावे असे शास्त्र सांगते.
दिवाळीतील पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. या दिवशी लक्ष्मी व कुबेराचे पूजन करून व्यापारी लोक वहीचे पूजन करतात. वही पूजनासाठी सकाळी ६:४५ ते ९:३० ही शुभ वेळ असून सकाळी ११ ते दु. १२:१५ व दुपारी ४:३० ते सायंकाळी ६ या वेळीदेखील वहीपूजन करता येईल. ज्यांना सायंकाळी वही पूजन करायचे आहे अशा व्यापाऱ्यांसाठी सायंकाळी ७:४० ते रात्री ९:१० या वेळेत वहीपूजनासाठी शुभमुहूर्त असेल, असे खगोल अभ्यासक व देशपांडे पंचांगकर्ते पंडित गौरव देशपांडे यांनी सांगितले.
