fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

हर्षिल, रोहन, मालविका, पूर्वा, नेहाची विजयी सलामी

व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : महाराष्ट्राच्या हर्षिल दाणी, रोहन गुरबानी, मालविका बनसोड, पूर्वा बर्वे, नेहा पंडित यांनी पुणे जिल्हा आणि मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने आयोजित व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे अधिकृत उदघाटन महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांच्या हस्ते झाले. यावेळी पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातू, अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, टूर्नामेंट रेफ्री ओमर राशिद, आयोजन समिती सचिव राजीव बाग, पीडीएमबीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष सदाशिव नातू तसेच श्रीकांत वाड, शिरीष बोराळकर, अविनाश जाधव, आनंद जोशी, सारंग लागू, शशांक हळबे यावेळी उपस्थित होते.यावेळी उपस्थित होते. याच वेळी पुणे येथे होणाऱ्या वरीष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

पात्रता फेरीतून आलेल्या हर्षिलने तमिळनाडूच्या खिरुथिक सी.चा २१-११, २१-१४ असा, तर रोहन गुरबानीने हरियाणाच्या बलराज कजलाचा २१-११, २१-१७ असा पराभव केला. पात्रता फेरीतून आलेल्या कर्नाटकाच्या डॅनिएल फरिद एस.ने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्राच्या आर्य भिवपाठकीला २१-१७, २१-१३ असे नमविले. यानंतर पात्रता फेरीतून आलेल्या राजस्थानच्या प्रणय कट्टाने महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीला २१-११, २१-१४ असे, तर कर्नाटकाच्या पृथ्वी रॉय के.ने महाराष्ट्राच्या वसीम शेखला २१-१७, २१-१४ असे पराभूत केले. कौशल धर्मामेरने तेलंगणच्या ऋषेंद्र तिरुपतीला २१-९, २२-२० असे नमविले.

महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत अग्रमानांकित मालविका बनसोडने पात्रता फेरीतून आलेल्या महाराष्ट्राच्याच ओजल राजकवर २१-९, २१-२ असा सहज विजय मिळवला. यानंतर रिया हब्बूने कर्नाटकाच्या ग्लोरिया आठवले व्ही.वर २१-१७, १८-२१, २१-१२ अशी, तर तिसऱ्या मानांकित पूर्वा बर्वे गोव्याच्या अंजनाकुमारीवर २१-११, २१-६ अशी मात केली. सातव्या मानांकित नेहा पंडितने पात्रता फेरीतून आलेल्या हरियाणाच्या चित्वान खत्रीवर १९-२१, २१-१५, २१-१५ असा, अकराव्या मानांकित श्रुती मुंदडाने महाराष्ट्राच्याच सानिका पाटणकरवर २१-१, २१-८ असा विजय मिळवला.

निकाल : पुरुष एकेरी – अभिषेक सैनी (हरियाणा) वि. वि. अधीप गुप्ता (गुजरात) २१-१८, २१-१४, कौशिक सी. एस. (तमिळनाडू) वि. वि. सिद्धार्थ मिश्रा (उत्तर प्रदेश) २१-१४, १२-२१, २१-१९, प्रणव राव गंधम (तमिळनाडू) वि. वि. हर्ष चापलोत (राजस्थान) २१-१८, २१-१६, तुकूम ला वि. वि. ऋषभ देशपांडे (महाराष्ट्र) १७-२१, २१-१८, २१-१५, मनराजसिंग (हरियाणा) वि. वि. किरणकुमार (तेलंगण) २१-१५, १९-२१, २१-१०, कार्तिक जिंदाल (हरियाणा) वि. वि. जस्करण सिंग (हरियाणा) २२-२०, २१-८, हेमंत एम. जी. (कर्नाटक) वि. वि. सिद्धान्त गुप्ता (तमिळनाडू) २२-२०, १३-२१, २१-१३.

महिला एकेरी – मिहिका भार्गव (मध्य प्रदेश) वि. वि. उत्सवा पलित (पश्चिम बंगाल) १४-२१, २१-७, २१-१६, मेघना रेड्डी (तेलंगण) वि. वि. हिमांशी रावत (उत्तराखंड) २१-१५, २१-९, मेघना एस. (केरळ) वि. वि. ऋथ मिशा विनोद २५-२३, २२-२०, ऐश्वर्या मेहता (मध्य प्रदेश) वि. वि. प्रीती के. (आंध्र प्रदेश) २१-१६, २५-२३, मधुमिता नारायण (महाराष्ट्र) वि. वि. प्रज्ञा के. पी. एस. (२२-२०, १४-२१, २१-११), श्रेया लेले (गुजरात) वि. वि. गायत्री राणी जैस्वाल (कर्नाटक) २१-१२, २१-११.

फोटो ओळ – शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कोर्टवर या व्ही. व्ही. नातू स्मृती अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा सुरु आहे . यावेळी खेळताना महाराष्ट्राचे खेळाडू. आणि स्पर्धेच्या उद्घाटनाची काही क्षणचित्रे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading