fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

ओके भाईकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे जप्त

पुणे:रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे जप्त2 तलवारी जप्त वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार ओके भाई यास त्याच्या साथिदारासह जेरबंद करण्यात वानवडी पोलीसांना मोठे यश आले आहे. यावेळी गावठी पिस्तूल, जीवंत काडतुसे व धारधार घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे हद्दीतील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण झाला आहे.

वानवडी पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरिक्षक जयवंत जाधव व पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख, राहुल गोसावी, निळकंठ राठोड, संदीप साळवे, अमोल गायकवाड हे वानवडी पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हयामधील अटक आरोपीकडे तपास करीत असताना त्यांना सराईत गुन्हेगार नामे ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे, रा. कोंढवा खुर्द, पुणे याचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असलेबाबत माहीती मिळाली.

ओमकार कापरे हा पोलोस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो नेहमी सशस्त्र असतो तसेच तो जे.एस.पी.एम. कॉलेज परिसर येथे येणार आहे.” अशी बातमी मिळाल्याने सपोनि जयवंत जाधव यांनी सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांना कळविताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

वरिष्ठांचे परवानगीने तपास पथकातील स्टाफसह जे.एस.पी.एम. कॉलेज रोड, काळेपडळ, हडपसर, पुणे येथे जावून दोन टिम करुन सापळा रचुन थांबले असता, बातमीतील वर्णनाचा इसम व त्याचे सोबत आणखी एक इसम तेथे अहिल्यादेवी होळकर चौकाकडुन वैष्णवसिटी कडे जाणारे रोडने फुटपाथने चालत येताना दिसले त्यावेळी त्यांना अत्यंत शिताफीने जागीच पकडुन त्यांना प्रथम त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १) ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे, रा. पर नं.०९, संत गाडगेबाबा शाळेसमोर, लक्ष्मी निवास, कोंढवा खुर्द पुणे व २) मनिष ऊर्फ आकाश मारुती झांबरे, रा. झांबरे तालीम संघ, गणेश मंदिराजवळ, होळकरवाडी, ऊरुळी देवाची, पुणे अशी असल्याची सांगीतले. त्यावेळी त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेता आरोपी नामे ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे याचे कमरेचे पाठीमागे पैन्टमध्ये खोसलेले एक अग्नीशस्त्र मिळुन आले. त्याचे मॅगझीन चेक केले असता त्यात ५ जिवंत काडतुसे देखील मिळून आली. ते त्यांचेकडुन जप्त करून ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading