Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

कंत्राटी सुरक्षा रक्षकांना दिवाळी बोनस मिळावा आपची PMP कडे मागणी

पुणे :आपल्या खात्यात कायम सुरक्षा रक्षक कर्मचा-यांबरोबरच कंत्राटी पध्दतीने सुरक्षा रक्षक सेवा बजावत आहेत. बोनस कायद्यात कंत्राटी कामगारांना वेतनाच्या 8.33% रक्कम बोनस देण्याची तरतूद आहे. पण कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस रक्कम दिली जात नाही असे आम्हास समजले. तसेच कायम सेवकांना खुश होऊन पी एम पी एम एल प्रशासनाने या दिवाळीला जसे बक्षीस, सानुग्रह अनुदान दिले तसे ते कंत्राटी कामगारांना दिले नाही. हा भेदभाव आहे. समान काम, समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे ही उल्लंघन आहे. हा विरोधाभास दूर करणे आवश्यक आहे.

ह्या निवेदनाद्वारे आम्ही आपणास मागणी करतो की, कायम कर्मचाऱ्यांबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड करावी. या दिवाळीला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे आदेश आपल्याकडील कंत्राटदाराला द्यावेत. ह्यात विषमता दूर होवून, आपल्या संस्थेलाच ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त चांगली सेवा मिळेल. कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचारी यांना दिवाळी बोनस मिळावा
या मागणीसाठी आज आम आदमी पार्टी पक्षाकडून पी एम्. पी. एम. एल् च्या संचालकांना भेटून करण्यात आली.
यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते. अभिजीत मोरे ,कार्याध्यक्ष घनशाम मारणे,कुमार धोंगडे,अमोल मोरे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading