Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

फिक्की महिला आघाडी ने घेतली आणखी पाच दुर्गम गावे दत्तक

पुणे :महीला उद्योजिकाची फिक्की या संस्थेने आज पुणे जिल्ह्यातील पाच दुर्गम आणि विकासापासून दूर असणारी गावे दत्तक घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे .त्यांच्या या निर्णयाचे समाजातून आणि जिल्हा परिषदेकडून विशेष कौतुक होत आहे . सर्वशी ग्राम विकास योजना आणि फिक्की यांच्या वतीने हा संकल्प पूर्ण केला जाणार आहे .

या दत्तक योजनेतून गावातील रस्ते ,पाणी ,शिक्षण ,आरोग्य या बरोबरच महीला आणि युवकांना स्वयरोजगरासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे . हा उपक्रम भविष्यात महाराष्ट्र आणि देशभरात रोल मॉडेल ठरेल असा विश्वास यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि फिक्की च्या अध्यक्षा निलम सेवलेकर यांनी व्यक्त केला.
या उपक्रमासाठी अध्यक्षा नीलम सेवलेकर व फिक्की महीला आघाडी यांनी जिल्हा परिषद आणि शासन स्तरावर वेळोवेळी बैठका व भेटीगाठी घेतल्या .त्यासाठी त्यांना हा उपक्रम व त्याचे महत्त्व सर्वांना सांगितले आणि आज त्याचाच प्रत्यय म्हणून जिल्हा परिषद आणि फिक्की यांच्यात हा करार होत आहे .याआधी ही नीलम सेवलेकर यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून लवळे गाव दत्तक घेतले होते आणि त्याचेही काम अतिशय कौतकस्पद चालू आहे .
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,फिक्की च्या पुणे अध्यक्षा नीलम सेवलेकर ,खजिनदार सोनिया राव , उपाध्यक्षा पिंकी राजपाल , नुपूर पवार यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि फिक्की महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading