Saturday, August 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्यापासून पुढचे तीन दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला असून खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उद्यापासून पुढचे तीन दिवस मुंबई, पालघर, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्यानुसार, उद्यानांदेड, लातूर, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आदी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. विविध ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading