fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी डॅा.विनय सहस्रबुद्धे व विनीत कुबेर यांची निवड

पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान विश्वस्त मंडळाच्या सदस्य पदी इंडियन काउन्सील फॉर कल्चरल रिलेशन्स चे अध्यक्ष  डॅा. विनय सहस्रबुद्धे  व पुण्यातील विविध संस्थांच्या कार्यकारिणीवर कार्यरत असलेले व साकेत कम्युनिकेशन्स या जाहिरात संस्थेचे प्रमुख विनीत कुबेर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. काल झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ही निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र भूषण कै.बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन तसेच वयवर्ष ९० झाल्याने निवृत्तीची इच्छा आनंदराव कंग्राळकर यांनी व्यक्त केल्याने विश्वस्त मंडळावरील दोन जागा रिक्त झाल्या होत्या. बैठकीला संस्थेचे सर्व विद्यमान सदस्य उपस्थित होते. ज्यामध्ये अमृत पुरंदरे, जगदीश कदम, अरविंद खळदकर, सुनील मुतालीक व श्रीनिवास वीरकर आदींचा समावेश होता.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव येथे ४३२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ या भव्य प्रकल्पाच्या पहिल्या भागाचे लोकार्पण याच वर्षात करण्यात येणार असून ते नागरिकांना पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहात दि.२ ते दि.६ या कालावधीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे सादरीकरण दिल्ली येथे लाल किल्ल्याचे प्रांगणात संपन्न होणार असल्याचे यावेळी विश्वस्त मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading