Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रियंकाचे केले कौतूक

चित्रकार प्रियंका गुरव यांनी राज्यपालांचे पेन्सिलने रेखाटले हुबेहुब स्केच

पुणे : माईर्स एमआयटीच्या ज्यूनिअर कॉलेजमधील ११ विज्ञान शाखेची विद्यार्थीनी प्रियंका गुरव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पेन्सिल ने रेखाटलेले स्केच नुकतेच त्यांना भेट दिले. पुण्यातील राजभवन येथे आयोजित छोट्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी प्रियंका हिचा विशेष सत्कार करून भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, स्वाती कराड चाटे, अण्णासाहेब टेकाळे, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.के.एच.संचेती हे उपस्थित होते.
प्रियंका गुरव ही अत्यंत कष्टाळू असून चित्रकलेची आवड आहे. कोरोनाच्या काळात चित्रकलेची आवड निर्माण झाल्यानंतर या कलागुणासाठी कठीण परिश्रम घेतले. तीने आतापर्यंत अनेक नामवंत राजकीय, सामाजिक, सिनेसृष्टी, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेऊन त्यांचे स्केच काढून त्यांने भेट स्वरूप दिले. अत्यंत हुशार प्रियंकाने २०२२ मध्ये दहावीत ९१ टक्के गुण मिळवून शाळेत दुसार क्रमांक पटकविला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading