Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक एकवटले

पुणे: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे गोठावले होते. त्यामुळे परत शिवसेना निवडणूक आयोगाकडे आपल्याला चिन्ह मिळण्यासाठी अर्ज केला होता.भारतीय निवडणुक आयोगाकडून शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह देण्यात आले व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले असुन सदर चिन्हाचे अनावरण करण्यासाठी व माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आज पुण्यातील महर्षी कर्वे पुतळा चौक, कोथरूड येथे शिवसैनिकांनी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला.

यावेळी शिवसेनेचे गजानन थरकुडे, राजेश पळसकर , कोथरूड भागातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गजानन थरकुडे म्हणाले,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने पहिल्याच प्रयत्नात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिंकले आहेत, आमच्या पक्षाच्या नावात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचीही नावे आहेत. आम्ही चिन्हांबाबत जे तीन पर्याय दिले होते, त्यापैकी एक मिळाला आहे. म्हणून आम्ही आनंदी आहोत. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले आहे. पण बाळासाहेब हे नाव कोणाचेही असते. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मशाल घेऊन समर्थन देत आहोत .असे गजानन थरकुडे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading