Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNE

महाकाल मंदिर कॉरिडॉर लोकार्पणा निमित्त भाजप तर्फे महाआरती

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल मंदिर कॉरिडॉरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. उज्जैन येथे होणाऱ्या महाकाल लोक लोकार्पण कार्यक्रमनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी राज्यात ५०० शिवालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून . त्यानिमित्त आज पुण्यात ओमकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ येथे भाजप तर्फे महा आरती करण्यात आली.

या महा आरतीलाखासदार गिरीश बापट, आमदार श्रीकांत भारतीय , भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक गणेश घोष, धीरज घाटे,सृनील माने व भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल मंदिर कॉरिडॉरचे लोकार्पण माझ्या कार्यकर्त्यांना एका शॉर्ट फिल्म वर दाखवण्यात आले.

जगदीश मुळीक म्हणाले,आज भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल मंदिर कॉरिडॉरचे लोकार्पण करण्यात येत आहे याचा आम्हाला आनंद वाटत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या विकासात भरपूर कष्ट केले. आज आम्ही या दिवसाचे साक्षीदार होत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.असे जगदीश मुळीक म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading