fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

FedExच्या नवीन सर्वेक्षणानुसार, ‘न्यू नॉर्मल’ परिस्थितीत एसएमई उद्योगांसाठी ई-कॉमर्समधील संधी वाढण्याची चिन्हे

पुणे  – FedEx Corp. (NYSE: FDX) हिची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या FedEx Express द्वारे सादर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, आधीच भरभराट होत असलेल्या ई-कॉमर्स क्षेत्रात आणखी वाढीसाठी जागा आहे, यावर लहान व मध्यम आकाराच्या दोन्ही कंपन्या (एसएमई) आणि ग्राहक सहमत आहेत, तसेच हा कल ई-कॉमर्स क्षेत्रातूनही दिसून येत आहे. सुमारे ८३ टक्के भारतीय ग्राहकांनी गेल्या तीन वर्षांत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे आणि हे प्रमाण यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.

‘ई-कॉमर्स सर्वेक्षणात पुढे काय’ असे शीर्षक असलेल्या या सर्वेक्षणामध्ये भारतातील लहान व मध्यम आकाराचे उद्योग (एसएमई) आणि ग्राहक, तसेच एशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका क्षेत्र (एएमईए) या भागांतील १० इतर बाजारपेठा यांची मते आजमावण्यात आली. जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून या भागांतील ई-कॉमर्सची उत्क्रांती समजून घेणे आणि तिच्या भविष्यातील वाढीस चालना देणारे कल ओळखणे याबाबतचे संदर्भ गोळा करण्यात आले.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ग्राहक पर्सनलायझेशन, शॉपरटेन्मेंट आणि पेमेंट यांच्या पर्यायांमध्ये नावीन्यपूर्ण पर्याय शोधत असतात. त्यांना उत्कृष्ट अनुभव मिळवणे, नवीन ब्रँड शोधणे आणि खरेदी करणे हे सोयीस्कररित्या हवे असते. सध्याच्या सणासुदीच्या, उत्सवांच्या दिवसांत अनेक शॉपिंग फेस्टिव्हल्स उपलब्ध असल्याने, ग्राहक त्यांमध्ये जास्तीतजास्त सवलती कोठे मिळतील, याचा शोध घेत असतात. एकंदरीत या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की नवीन पद्धतींचा प्रयोग करण्यासाठी आणि ग्राहकसंख्या वाढवण्यासाठी ई-टेलर्सना भरपूर वाव आहे.

“कोविडमुळे आपली सर्वांची जीवनशैली अशा एका टप्प्यावर आली आहे, जिथे ऑनलाइन खरेदी करण्यास प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व भूप्रदेशांमध्ये ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून आता या पद्धतीतून माघार घेणे कोणालाही शक्य होणार नाही. म्हणूनच, ई-कॉमर्स हे क्षेत्र या ग्राहकांच्या या वाढत्या क्रयशक्तीचा भार पेलण्यास सज्ज झाले आहे,” असे FedEx Express चे एशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका (एएमईए) या विभागासाठीचे प्रेसिडेंट कंवल प्रीत यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, “अधिकाधिक लोक ऑनलाइन खरेदी करीत असल्याने ग्राहकांची प्राधान्येही अधिकाधिक आधुनिक होत चालली आहेत. एसएमई उद्योग आणि ई-मर्चंट हे आपापले ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म विकसित करत असताना, ग्राहकांना काय हवे आहे या विषयीच्या संधी आमच्या सर्वेक्षणातून त्यांच्यासाठी मांडल्या जात आहेत. ई-टेलर्स त्यांच्या ग्राहकांशी कसे गुंतून राहतात आणि आम्ही आमच्या शिपिंग सोल्यूशन्समध्ये कशाप्रकारे नवनवीन संशोधन करत आहोत, यांमागे ग्राहकांचा अनुभव ही एक प्रेरक शक्ती आहे. विशेषत: ई-कॉमर्स व्यवसायांसाठी विस्तारित स्वरुपाचा पोर्टफोलिओ विकसीत करून FedEx ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि ई-कॉमर्सची वाढ सुरू ठेवण्यासाठीच्या चांगल्या स्थितीत आहे.”

“एसएमई क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढीचे इंजिन आहे. कोविड साथीच्या काळात ई-कॉमर्स क्षेत्रामुळेच अनेक एसएमईंना आपला व्यवसाय सुरू ठेवता आला आहे आणि तो विस्तारण्याची संधीही मिळाली. आज, भारतातील एसएमई उद्योगांसाठी परदेशांमध्ये व्यापार करण्याच्या अनेक संधी चालून आल्या आहेत आणि य उद्योगांना त्यातून प्रगती साधता येत आहे. या एसएमईना जगाशी जोडण्यास FedEx मदत करते. याकामी आमचे जागतिक नेटवर्क, खास तयार केलेली सोल्यूशन्स आणि मूल्यवर्धित सेवा त्यांना सहाय्य करतात आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास त्यांना सक्षम करतात,” असे FedEx चे मध्य पूर्व, भारतीय उपखंड व आफ्रिका कामकाज या क्षेत्राचे सिनीअर व्हाइस प्रेसिडेंट कामी विश्वनाथन यांनी सांगितले.

ई-कॉमर्स क्षेत्र परिपक्व; परंतु आणखी वाढीच्या दिशेने वाटचाल

एशिया पॅसिफिक प्रदेशात भारत, मेनलँड चायना, जपान आणि कोरिया यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स बाजारपेठांचा समावेश होतो. या प्रदेशातील ५७ टक्के लोकसंख्या ऑनलाइन पद्धतीने खरेदी करीत असल्याने ई-कॉमर्स विक्रीतून येथे मिळणारा महसूल २.०९ लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

एएमईएमधील एसएमई आणि ग्राहक हे दोघेही आपल्या ई-कॉमर्सच्या वापराबाबत परिपक्व होत आहेत आणि कोविडमुळे ई-कॉमर्सला जी चालना मिळाली, ती यापुढेही कायम राहणार आहे, याबाबत हे दोन्ही गट सहमत आहेत. दहापैकी आठ एसएमईंना विश्वास आहे की पुढील तीन वर्षांत त्यांच्या व्यवसायात ई-कॉमर्सला अधिक महत्त्व प्राप्त होईल आणि दहापैकी नऊ जणांना वाटते की ते या आव्हानासाठी सुसज्ज आहेत. ८० टक्के ग्राहकांनी नोंदवले आहे की ई-कॉमर्सने गेल्या तीन वर्षात त्यांच्या एकूण खरेदीत मोठा वाटा उचलला आहे, तर ७१ टक्के ग्राहकांच्या मते यात आणखी वाढ होणार आहे.

पुढील तीन वर्षांत आपल्या देशांत ई-कॉमर्स क्षेत्र वाढेल, याविषयी भारत, मलेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम येथील एसएमई उद्योग सर्वाधिक आशावादी आहेत. या बाजारपेठेतील ग्राहकांनीही हीच भावना व्यक्त केली. या प्रत्येक बाजारपेठांमध्ये ई-कॉमर्सचे प्रमाण एकूण किरकोळ विक्रीच्या ६ टक्क्यांपेक्षा सध्या कमी आहे.

कोविडमुळे ग्राहकांच्या खरेदीची वर्तणूक मूलभूतपणे बदलली आहे, असे भारतातील ८० टक्के एसएमई उद्योगांचे मत आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांचा अंदाज असा आहे की ई-कॉमर्स सतत तेजीत राहील आणि पुढील तीन वर्षांत तो त्यांच्या व्यवसायाच्या वाढीचा अविभाज्य भाग असेल. ९३ टक्के एसएमई यामुळे उत्साहित आहेत आणि त्यांना विश्वास आहे की या वाढीचा फायदा घेण्यासाठी ते योग्य स्थितीत आहेत.

सध्या आणि भविष्यातही ई-कॉमर्सच्या एकूण संदर्भात बाजारपेठांच्या महत्त्वाबाबत भारतीय एसएमई आणि ग्राहक हे दोघेही सहमत आहेत. खरेतर, दोन तृतीयांश भारतीय ग्राहक अजूनही केवळ बाजारातून प्रत्यक्ष रुपात वस्तू खरेदी करतात. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारपेठेचे हे महत्त्व स्पष्ट असतानाही सध्या ५८ टक्के एसएमई उद्योग त्यांच्या स्वतःच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना थेट विक्री करतात, हेही लक्षात घेतले पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading