fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

 फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धा: सहभागी संघांची ओळख

फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धा सुरु होण्यास काही अवधी शिल्लक राहिला आहे आणि या स्पर्धेतील सहभागी 16राष्ट्रीय संघ आता दाखल झाले असून 11 ऑकटोबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत हे गुणवान फुटबॉलपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत..

सलामीची लढतीत ओडिशा, गोवा ता ठिकाणी होणार असून भारताचा सामना यूएसए संघाशी रात्री 8 वाजता भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणार आहे. या गटात मोरोक्को व ब्राझील या संघांचा देखील समावेश आहे.
सातवी मालिका असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संघांची विभागणी ही अ, ब, क आणि ड अशा चार गटात करण्यात आली असून नवी मुंबई येथे 30 ऑकटोबर रोजी अंतिम सामना होणार आहे.

 

फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धेत तीन माजी विजेते फ्रांस, जपान आणि स्पेन हेसंघ देखील मैदानात उतरणार असून दरवर्षीप्रमाणेच सहभागी होत असलेले कॅनडा, जर्मनी आणि न्यूझीलंड यांची देखील चुरस पाहायला मिळणार आहे.
गट अ – पदार्पण करणारे भारत आणि मोरोक्को ब्राझीलसह अमेरिका
भारतीय मुलींच्या संघाला फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत आपली क्षमता दाखविण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत आहे. सलामीला भारतासमोर अमेरिकेचे आव्हान आहे. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या मोरोक्को आणि तगड्या ब्राझीलशी त्यांना खेळायचे आहे. ब्राझील हा स्पर्देतील सर्वात अनुभवी संघ असून, सहाव्यांदा ते या स्पर्धेत सहभागी होत आहेत. मात्र, दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करता आलेला नाही. स्पर्धेत मोरोक्को आणि भारत पदार्पण करणार असून, त्यांच्याकडून किमान कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. अमेरिका संघ पाचव्यांदा या स्पर्धेत खेळणार असून, आतापर्यंत त्यांनी १५ सामन्यात ६ विजय मिळविले आहेत. तीन सामने त्यांनी बरोबरीत सोडवले आहेत. या कामगिरीत सुधारणा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट असेल. २००८मध्ये अमेरिका उपविजेते राहिले होते. पण, त्यानंतर त्यांना गटातूनही बाहेर पडता आलेले नाही.

स्पर्धेचे उदघाटन 11ऑकटोबर रोजी भुवनेश्वर येथे होणार असून भारताचा सामना यूएसए संघाशी, तर मोरोक्को संघाचा सामना ब्राझील संघाशी होणार आहे.

ब गट – फेव्हरेट जर्मनी नायजेरिया, चिली आणि न्यूझीलंड
या गटातून संभाव्य विजेते जर्मनी आपली वाटचाल सुरु करतील. या स्पर्धेत २०१४ पासून जर्मनी केवळ एकदाच अपयशी ठरले आहेत. विशेष म्हणजे २०१० मध्ये त्यांची कामगिरी सर्वोत्तम होती. त्यांनी २०१०च्या स्पर्धेत सर्वाधिक २२ गोल केले होते. कायरा मालिनॉस्कीने एकाच स्पर्धेत सलग सामन्यात हॅटट्रिक साधण्याची कामगिरी केली होती.
नायजेरिया हा गटातील दुसरा बलवान संघ. नायजेरियाने यापूर्वी पाच वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अलिकडच्या काळात त्यांच्या कामगिरीत फारसे सातत्य नाही. पण, भारतातील स्पर्धेने ते यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील नायजेरियाच्या यशाची टक्केवारी ५० टक्के आहे. २०१२ मध्ये  मध्ये त्यांनी अझरबैजानविरुद्ध ११ गोलकरताना स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त-सर्वात मोठा विजय नोंदवला. दरम्यान, चिली या स्पर्धेत दुसऱ्यांदा खेळण्यासाठी सज्ज आहे. 2010 च्या आवृत्तीत त्यांना फक्त एकदाच गोल करता आला. त्यांनी १० गोल स्विकारले होते.

फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया  स्पर्धेचे यजमान हीच या गटातील न्यूझीलंडची ओळख सांगता येईल. त्यांनी २०१८ मध्ये कांस्यपदक पटकावले होते.  आतापर्यंत 21 सामन्यात 5 विजय आणि 14 पराभव अशी त्यांची कामगिरी आहे.

क गट – गतविजेते स्पेन, मेक्सिको, कोलंबिया आणि चीन
गतविजेता स्पेन हा स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. या स्पर्धेत सर्वप्रथम पात्र ठरल्यापासून ते एकदाही पहिल्या तीनमधून बाहेर पडलेले नाहीत. दोन कांस्य पदके, एक रौप्य आणि एक सुवर्ण अशी या संघाची कामगिरी आहे. आतापर्यंत 14 सामन्यात त्यांनी 58 गोल केले असून, 7 सामने जिंकले, तर ४ सामन्यात पराभव स्विकारला आहे. 4 गमावले आहेत.

मेक्सिको संघातही सातत्य आहे. फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेत 2018 मध्ये उपविजेते ठरले. मेक्सिकोने २० सामन्यांमध्‍ये ८ सामने जिंकले आणि ८ सामने गमावले आहेत. या वर्षीदेखिल निश्चितपणे त्यांच्या वाटचालीवर लक्ष राहिल.
कोलंबिया नेहमीच विश्वचषक स्पर्धेतील स्पर्धात्मक संघांपैकी एक आहे. यावेळी त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यांनी या युवा स्पर्धेच्या बाद फेरीपर्यंत कधीही मजल मारलेली नसली, तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही.
चायना पीआर   फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया स्पर्धेत तिसऱ्यांदा खेळत आहेत. चीनने आतापर्यंत ६ सामन्यात  फक्त दोन सामने जिंकले आहेत.

गट ड – जपान, टांझानिया, कॅनडा आणि फ्रान्स
यंदाच्या स्पर्धेतील हा सर्वांत कठिण गट मानला जातो. आशियाई फुटबॉलची ताकद मानल्या जाणाऱ्या जपानच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. त्यांनी एकदा विजेतेपद मिळविताना प्रत्येक वेळेस किमान उपांत्यपूर्व फेरी पर्यंत मजल मारली आहे. तीनवेळा अंतिम लढतीत खेळताना ते एकदा विजेते ठरले आहेत. आतापर्यंत जपानने 30 सामन्यात 22 सामने जिंकले आहेत आणि केवळ 2 गमावले आहेत. आतापर्यंतच्या सहभागात त्यांनी 106 गोल केले आहेत आणि फक्त 22 गोल स्वीकारले आहेत.

स्पर्धेतील आणखी एक सदैव उपस्थित असलेला संघ म्हणजे कॅनडा.   केवळ दोनदाच प्रगती करण्यात कॅनडा संघ अयशस्वी ठरला आहे. गेल्या आवृत्तीत कॅनडा चौथ्या स्थानावर राहिला होता. निःसंशयपणे, ते त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील
माजी विजेत्या फ्रान्सचे या स्पर्धेतील फ्रान्सने २०१२ मध्ये स्पर्धा जिंकली होती, तर 2008 मध्ये त्यांना गटातूनही बाहेर पडता आले नव्हते.

भारत, मोरोक्को प्रमाणे टांझानिया संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading