Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचे पैसे दान करो आंदोलन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठातील जवळपास सर्व विभागांचे शैक्षणीक शुल्क दुपटीने वाढवण्यात आले. या विषयात अभाविप कडून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांना सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात मात्र या ठिकाणी ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या अधिक आहे. प्रत्येकच विद्यार्थ्याला हे अवाढव्य पणे वाढलेले शुल्क भरणे शक्य नाही. विद्यापीठात अनेक विद्यार्थी “कमवा-शिका” अंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करतात. विद्यापीठाकडून यावर्षी अनेक कोर्सेस च्या शुल्कामध्ये अवाजवी पणे वाढ करण्यात आली आहे. निवेदन देऊन या सर्व बाबींवर उजाळा टाकायचे काम करून देखील विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय थांबवला नाही. परिणामी, या अवाढव्य शुल्क वाढ मागे घ्यायला लावण्यासाठी अभाविप च्या वतीने विद्यापीठ प्रांगणात पैसे दान आंदोलन करण्यात आले.

“बी बी ए” या कोर्स ची फी ४२,००० हजार वरुन ७३,००० रुपय “MA” १५००० वरुन ३०,०००,”M-COM” १६००० वरुन ३२००० वाढवण्यात आली आहे.तर,गणित विषयाच्या विद्यार्थ्यांकडून लॅबोरेटरी शुल्क आकारण्यात आले आहे. शुल्कामध्ये अचानक केलेला हा बदल अवाजवी आहे. विद्यार्थी एवढी अवाढव्य शुल्क भरू शकणार नाहीत. ही शुल्क लवकरात लवकर पूर्ववत करावी, आणि विद्यार्थ्यांची अडचण सोडवावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा आंदोलनात्मक इशारा ३० सप्टेंबर ला च विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांना देण्यात आला होता. मात्र, या विषयात प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक दखल घेण्यात आली नाही.

विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय थांबविण्यासाठी अखेर अभाविप ने आज दिनांक १० ऑक्टोबर ला विद्यापीठ प्रांगणात पैसे दान आंदोलन केले.
जोपर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून आकारण्यात आलेली वाढीव शुल्क कमी होत नाही तो पर्यंत विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करत राहिल. याविषयात विद्यापीठ प्रशासनाकडून अजून तरी कोणती ठाम भूमिका मांडण्यात आली नसून त्यांच्या सोबत चर्चा करून विद्यार्थी हितात निर्णय घेण्यासाठी अभाविप कटीबद्ध आहे असे वक्तव्य अभाविप प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी यावेळी केले.
या वेळेस प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे,महानगर सहमंत्री अमोल देशपांडे, हर्षवर्धन हरपुडे,  शांभवी साले, शंतनू ढमढेरे, श्रावणी मेस्त्री विद्यापीठ  महादेव रंगा व इतर कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading