अजित पवार यांनी तू निवडून कसा येतो हे म्हणण्यापेक्षा मुलगा कसा पडला हे पाहावं -विजय शिवतारे
पुणे : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विजय शिवतरे यांना सासवडच्या भाषणात बोलताना तू निवडून कसा येतो असे आवाहन दिले त्यामुळे सासवड मध्ये विजय शिवतरे विरुद्ध अजित पवार असा आक्रमक निवडणुकीमध्ये सामना पाहायला मिळाला होता. त्यावर अजित पवार यांनी तू निवडून कसा येतो हे म्हणण्यापेक्षा मुलगा कसा पडला हे अजित पवार यांनी पाहव . असे आवाहन माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांना केले.
माझ्याविरोधात कटकारस्थान करून मला पाडल मी त्यावेळीही उद्धव ठाकरे आणि मातोश्री यावरील नेत्यांना सागितले होते.अजित पवार बोलताना मिशी पिळून बोलतात.देशात अनेक नेते उच्चपदावर गेले पण पवार साहेब का झाले नाहीत पंतप्रधान झाले नाहीत. असा सवाल माजी मंत्री विजय शिवतरे यांनी शरद पवार यांच्यापुढे उपस्थित केला.
विजय शिवतरे यांनी पार्थ पवार यांच्या विरुद्ध
प्रचार केला होता . त्यामुळे अजित पवार यांनी सासवडच्या सभेत विजय शिवतारे सासवड मधून कसा निवडून येतो. असे आवाहन केले होते. त्यावर पार्थ पवार विरोधात मी प्रचार केला तो राग अजित पवार यांनी माझ्याविरोधात काढला,त्यानी मला खूप त्रास दिला,राजकारण नाही तर उदयोगातही त्रास दिला. आता आरोप शिवतरे यांनी अजित पवार यांच्यावर केला.
भाजपने बारामती ताब्यात घेण्यासाठी बारामती मिशन चालू केले आहे. त्यावर शिवतारे म्हणाले,2014 लाच बारामती लोकसभा मतदारसंघ सर झाला असता पण आम्ही आता सगळे एकत्र आलो आहे बघा,नियती आपला खेळ खेळणार . अशी टीका शिवतरे यांनी शरद पवार यांच्यावर केली.
शिवसेनेचे नेते सारखे शिंदे गटातील मंत्र्यांना 50खोके असे सारखे चिडवत असतात.आमचे लोक काय खोकेवाले लोक आहेत का? आमचा पानटपरी वाला आहे,हे पवार कुटूंब आक्या आशियातील सर्वात श्रीमंत राजकीय कुटूंब आहे.कोट्यवधी रुपये संपत्ती आहे त्याच्याकडे आहे.त्यांनी ज्या चुका केल्या ती केल्या मी त्या चुका करणार नाही.असे विजय शिवतारे म्हणाले.
अजित पवार यांना राग आला की कोणाची इज्जत काढतात. अजित दादा रागाने बोलेल पण कपटी नाही,मित्र म्हणून दादा ला नक्की मदत करेल पण राजकीय मदत नाही .
