शिवसेनेचे चिन्ह गोठवल आहे.त्याला भाजप जबाबदार आहे हे म्हणणे हास्यास्पद -सुधीर मुनगंटीवार
पुणे: निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटातील पक्ष चिन्हा बाबत काल निर्णय दिला आहे.आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली.यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.याला भाजप जबाबदार आहे.अस महाविकास आघाडी सरकार मधील नेते सांगत आहे.तर शिंदे गटाकडून याला शरद पवार हे जबाबदार आहे.अस सांगितल जात आहे.यावर आज जे विरोधक टीका करत आहे की शिवसेनेच जे चिन्ह गोठवल आहे.त्याला भाजप जबाबदार आहे हे सर्व हास्यास्पद आहे. अशी टीका वन सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुनगंटीवार म्हणाले,जेव्हा शिवतीर्थावर मेळाव्याला परवानगी मिळाली तेव्हा भाजपला धन्यवाद नाही तर न्यायालयाला धन्यवाद देण्यात आलं आणि आत्ता आयोगाने प्रक्रिया पूर्ण केल्यावर याला भाजप जबाबदार म्हटन म्हणजे लोकशाहीचा अवमान आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला दोष देण्यापेक्षा आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे.
आपण पाहिलं तर 2019 पासून शिवसेनेचं जे पवार यांच्या बाबतीत राजकीय प्रेमाची भाषा सुरू झाली आणि तिन्ही पक्षांचं सरकार आलं. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवार म्हणाले,वैचारिक टोकाचे मतभेद असूनही हे एकत्र आहे.बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस बाबत म्हणाले होते.की आयुष्यात मी यांच्या सोबत बसणार नाही.काँग्रेस सोबत जेव्हा जाईल तेव्हा दुकान बंद करेल.आणि मांडीला मांडी लावून बसले.आणि आज बाळासाहेब ठाकरे यांच्याच आशीर्वाद असेल की धीरे धीरे दुकान होत आहे.आणि हे निसर्गाचं चक्र आहे.
सरकार आता कोणत्या पक्षाचा आहे याबाबत मुनगंटीवार यांना विचारला असता ते म्हणाले की राज्य जननी शिवसेनेच्या बहुमताचा आकडा आणि गट आपल्या ताब्यात घेतला ते आणि भाजप यांची सत्ता राज्यात आहे तसेच हिंदुत्ववादी आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार तसेच जनता आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार या राज्यात आहे अस यावेळी मुनगंटीवार म्हणाले.
