fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पुणे मनपाच्या सेवेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना थकीत वेतन तातडीने महापालिकेने द्यावे -आप

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील शेकडो कंत्राटी सुरक्षारक्षकांचे जून २०२२ पासून ते सप्टेंबर २०२२ पर्यंत चार महिन्यांचे वेतन तर काही कामगारांचे त्याहून अधिक महिन्यांचे वेतन क्रिस्टल कंपनीद्वारे थकीत झाले असल्याची बाब आम आदमी पार्टीच्या निदर्शनास आली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल सुरु आहेत. कुटुंब कसे चालवावे हा प्रश्न कामगारांपुढे आहे. दिवाळी सण कसा साजरा करायचा हा यक्ष प्रश्न या कामगारांपुढे आहे. केलेल्या कामाचे वेतन न देणे हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच ठेकेदाराने कामगारांचे वेतन दिले की नाही हे तपासणे आणि दिले नसल्यास त्यांना द्यायला लावणे व कामगार हिताच्या तरतुदीला हरताळ फासणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

तरी, याची आपण तातडीने दखल घेऊन पुणे मनपाच्या सेवेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन तातडीने अदा करुन त्यांची दिवाळी गोड करावी, ही विनंती. अशी मागणी आपचे विजय कुंभार, राज्य संघटक आणि पुणे शहर कार्याध्यक्ष यांनी केली.

*भाजपचे विधान परिषदेतील सर्वात श्रीमंत आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर सत्ताधारी भाजप – शिंदे सरकारचा राजकीय वरदहस्त असल्याने तिच्या विरोधात अद्यापही कोणतीही प्रशासकीय व फौजदारी कारवाई होत नाही. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे असा अहवाल कामगार कल्याण विभाग व सुरक्षारक्षक विभागाने दिलेला आहे अशी आमची माहिती असून पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करत नाहीत, ही अतिशय खेदाची बाब आहे.

तरी वारंवार सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवणाऱ्या, कराराचा भंग करणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर दंडात्मक कारवाई करत तिला काळ्या यादीत टाकावे, ही विनंती. अन्यथा पालिकेतील कंत्राटी कामगारांना संघटीत करत आम आदमी पक्षाला आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी तुमची असेल. असा इशारा विजय कुंभार यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading