Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

ऍड. सतीश मुळीक, जितेंद्र भोसले यांच्यावर फसवणूक व मारहाणीचा गुन्हा

ऍड. मुळीक यांनी केली 1 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक

पुणे:पुणे बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक, जितेंद्र भोसले यांच्यावर फसवणुकीसह मारहानीचा गुन्हा दाखल झाला आहे. ऍड. सतीश मुळीक यांनी जागेच्या व्यवाहारातून तब्ब्ल 1 कोटी 35 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार येरवडा पोलीस ठाण्यात कैलास पठारे यांनी दिली आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास बबन पठारे हे व आरोपी ऍड. सतीश मुळीक हे मित्र आहेत. फिर्यादी पठारे यांची स. न.14/2 याठिकाणी एकूण 3 हेक्टर 32 आर. ही वडिलोपार्जित जमीन आहे. सदर जागेतील 79 आर क्षेत्र हे स्वास्तिक डेव्हलपर्स यांना रजिस्टर डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून दिली होती. 10 जानेवारी 2006 रोजी करार केला होता. पठारे यांना स्वास्तिक डेव्हलपर्स यांच्याकडून 1 कोटी 35 लाख रुपये रक्कम मिळाली होती. पठारे हे रक्कम मोजणेसाठी ऍड. सतीश मुळीक यांच्या घरी गेले होते. रात्र झाल्याने ऍड. मुळीक यांनी पठारे यांना रक्कम घरीच ठेवण्यास सांगितले.

पठारे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून जमिनीच्या व्यवहारातून मिळालेली रक्कम मुळीक यांच्या घरी ठेवली. दुसऱ्या दिवशी पठारे घेण्यासाठी मुळीक यांच्या घरी गेले असता मुळीक तीन चार दिवस बाहेर गेल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. पुन्हा आठ दिवसांनी फिर्यादि पैसे मागण्यासाठी गेले असता माझ्याकडे पैसे काही दिवस राहू देत असे मुळीक यांनी सांगितले. त्यानंतर देखील त्यांनी अशीच उडवाउडवीची उत्तरे देऊन माझे 1 कोटी 35 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. 7/6/2022 रोजी तर पठारे यांना ऍड. मुळीक यांचा मुलगा अग्रजीत मुळीक, जितेंद्र भोसले, राम भुजबळ यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading