fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

Bigg Boss Marathi – lकोण होईल घराचा पहिला कॅप्टन ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चान्स पे डान्स या उपकार्यात टीम A विजयी ठरली. टीम A ने चौथ्या सिझनच्या पहिल्या साप्ताहिक कार्यात विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली. आता बघूया टीम B कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्यचे उमेदवार. काल कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य एलिमनेट झाले.

आज बिग बॉस सदस्यांना सांगणार आहेत, “आज बिग बॉसच्या घरात पडणार आहे पैशाचा पाऊस, आणि या पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे पहिले कॅप्टन पद मिळवण्याचा बहुमान. आपल्यासोबतच अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे हे बघण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन चारच पहिला कॅप्टन कोण होईल. त्यामुळे सुरु करूया बिग बॉस मराठी सिझन चारचे पहिले कॅप्टन्सी कार्य”!

बघूया कोण होईल घराचा पहिला कॅप्टन. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading