fbpx

सोनालीका ट्रॅक्टरच्या विक्रीत २. २ टक्क्यांची वाढ   

पुणे  :  भारतातील आघाडीचा आणि शेतकऱ्यांच्या पसंतीचा नंबर वन  निर्यात ब्रँड असलेल्या  सोनालिका ट्रॅक्टर्सने  आर्थिक वर्ष २०२२ – २३ मध्ये  आतापर्यंत  १८,६१९  ट्रॅक्टरची कमाल विक्री आणि  बाजारपेठेतील१५ टक्क्यांची  नोंद केली आहे. विक्रीच्या या  कामगिरीमध्ये  २६.२टक्के  वाढीचा समावेश असून  उद्योगाच्या वाढीपेक्षा  जास्त आहे. सोनालिकाने आतापर्यंतच्या  १५,५६३  ट्रॅक्टर्सच्या उत्पादनाचीसुद्धा नोंद केली आहे.  सोनालिकाच्या प्रगत ट्रॅक्टरवर आता १४० देशांमधील १४ लाख शेतकऱ्यांचा विश्वास असून सर्व शेतांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारे अशी त्यांची जागतिक पातळीवर ओळख आहे.

जुलै२०२२ मध्ये घोषणा करण्यात आलेल्या आयटीआय उमेदवारांच्या भरती मोहिमेला मिळालेल्या अपार प्रतिसादाबद्दलही सोनालिका ट्रॅक्टर्स आनंदीत आहे. एकूण नव्या भरतीपैकी २००० पेक्षा अधिक विद्यार्थी संपूर्ण भारतभरातील सोनालिका चॅनेल पार्टनरच्या मनुष्यबळामध्ये अगोदरच रुजू झाले आहेत. कंपनीला विश्वास आहे की त्यांची अद्‌भूत प्रतिभा भारताला उज्जवल भविष्याकडे घेऊन जाईल आणि कंपनीला खेड्यांमध्ये आपला विस्तार करण्यास निश्चितच मदत करेल.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की  आमच्या कस्टमाईज्ड ट्रॅक्टरच्या भेटीला मिळालेल्या अपार प्रतिसादाचा आम्हाला आनंदच आहे. आणि आमचे उत्पादनही आम्ही वाढवले आहे. आतापर्यंतची कमाल मासिक विक्री म्हणजे१८,६१९ आणि  १५ टक्के  बाजारपेठेचा हिस्सा मिळवून तसेच उद्योगाच्या  वाढीपेक्षा अधिक अधिक म्हणजे २६.२टक्के  वाढ गाठल्यामुळे आम्ही उत्साहीत आहोत. तसेच सणांच्या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आतापर्यंतचे विक्रमी १५,५६३ चे उत्पादन केले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: