fbpx

नरेंद्र सोपल मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धा उद्यापासून 

पुण्यातील क्लबमधील एकुण 24 संघांचा सहभाग

पुणे : कॅपोविटज प्रायव्हेट लिमिटेड, मानेग्रो आणि टॉवर ट्रान्समिशन यांच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या नरेंद्र सोपल मेमोरियल आंतर क्लब टेनिस  स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील एकुण 24 संघांमध्ये 192हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा एमएसएलटीए टेनिस कोर्ट, म्हाळुंगे बालेवाडी येथे दि.7 ऑकटोबर 2022 पासून सुरू होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक समीर भामरे म्हणाले की, टेनिसप्रेमी कै. नरेंद्र सोपल यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत एकुण 75हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला 50 हजार रूपये व करंडक , तर उपविजेत्या संघाला 25हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके  देण्यात येणार आहे.

स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ 1, एसेस युनायटेड, टेनिसनट्स पंचायत 2, फॉरेस्ट हंटर्स, टीम एफसी, लॉर्ड ऑफ द स्ट्रिंग्स, तीर्थ टॉवर्स, टीएफएल(फ्री रॅडिकल्स), टेनिसनट्स पंचायत 1, पाल्म चॅलेंजर्स, पीसीएलटीए 2, गोल्डन बॉईज, एमडब्लूटीए, टीम मेट्रोसिटी, मुधोजी क्लब 2, टीम बालेवाडी,पीसीएलटीए 1, महाराष्ट्र मंडळ 2, रॉजर्स रेंजर्स, मॉन्ट व्हर्ट, पीवायसी, ओडीएमटी, मुधोजी क्लब 1, फोरहँड स्लॅमर्स हे संघ झुंजणार असल्याचे भामरे यांनी नमूद केले.

तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. शहरातील हौशी टेनिस खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  स्पर्धेचे उदघाटन पीसीएमसी कमिशनर अंकुश शिंदे(आयपीएस) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: