‘तन्मय इन हार्मनी’ कार्यक्रमात अनुभवायला मिळणार पारंपारिक आणि पाश्चात्य वाद्यांची अनोखी जुगलबंदी
पुणे : हार्मोनियम’च्या साथीला तबला या भारतीय पारंपारिक वाद्यासोबातच ड्रम,गिटार आणि पियानो यांसारख्या पाश्चात्य वाद्यांची साथ, या देशी-विदेशी वाद्यांची अनोखी जुगलबंदी आणि त्यांच्या सांगीतिक मिश्रणातून तयार होणारे अनोखे संगीत अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित आहे, कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रंगणाऱ्या ‘तन्मय इन हार्मनी’ या कार्यक्रमाचे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध तरुण हार्मोनियम वादक तन्मय देवचके हे आपल्या संगीत वाद्यवृंदाच्या मदतीने हार्मोनियम वादनाच्या यापूर्वी कधीही सादर न झालेल्या रचना प्रस्तुत करतील. त्यांना आशय कुलकर्णी हे तबल्यासाठी, तन्मय पवार गिटारसाठी, अभिषेक भूरूक पर्कशनसाठी, अमृता ठाकूरदेसाई या सिंथेसायझरसाठी आणि अथर्व कुलकर्णी हे हार्मोनियमसाठी साथसंगत करतील.
इनफायनाईट व्हेरीएबल’तर्फे आयोजित हा कार्यक्रम शनिवारी, ८ ऑक्टोबर रोजी एरंडवणे येथील ‘द बेस’ येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे. यासाठी www.skillbox.com याठिकाणी तिकीट बुकिंग करता येईल.
